भाजपा योग प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष पदी देवेंद्र पाटील यांची नियुक्ती :


भुसावळ – देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डाजी यांच्या नेतृत्वात तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, प्रदेशाद्यक्ष आ चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे ग्रामविकास व पर्यटन मंत्री ना. गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाने आ. चैनसुख संचेती आणि जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टी जळगाव पूर्व जिल्ह्याच्या योग प्रकोष्ठ अध्यक्ष पदी देवेंद्र देविदास पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.

भारतीय जनता पार्टीचे सक्रीय कार्यकर्ते म्हणून जबाबदारी स्विकारल्याने योग प्रशिक्षक देवेंद्र पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.
जबाबदारीमुळे पक्षाचेही काम जिल्हात वाढेल यात काही शंका नाही.
आपल्या या निवडी बद्दल राज्याचे ग्रामविकास व पर्यटन मंत्री ना. गिरीष महाजन, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, प्रदेश मुख्यालय प्रभारी . रवी अनासपुरे, . खा. रक्षा खडसे, आ. संजय सावकारे, बेटी बचाव बेटी पढाव राष्ट्रीय संयोजक . राजेंद्र फडके, प्रदेश चिटणीस अजय भोळे, लोकसभा निवडणूक प्रमुख. नंदकिशोर महाजन, जिल्हा सरचिटणीस परिक्षीत बह्राटे, भुसावळ शहर प्रमुख युवराज लोणारी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.