भुसावळ – भुसावळ कला विज्ञान आणि पु. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील प्रा. डॉ. बी. एच. बऱ्हाटे आणि प्रा. हर्षल विश्वनाथ पाटील, डॉ गौरी एम. पाटील, डॉ सचिन एस. कोलते यांचे पेटंट सादर केले असून “A MACHINE LEARNING APPROACH TO PREDICTING PSYCHOLOGICAL AND SOCIAL STRESS AMONG COLLEGE STUDENTS”
या पेटंट चे इन्व्हेंशन आहे . ते सध्याचा शोध मशीन लर्निंग आणि प्रेडिक्टिव ॲनालिटिक्स या क्षेत्राशी संबंधित आहे, सध्याच्या आविष्काराचा प्राथमिक उद्देश विश्वासार्ह आणि सक्रिय प्रदान करणे आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आणि सामाजिक तणावाचा अंदाज लावण्यासाठी प्रणाली मशीन लर्निंगचा वापर. प्रगत अल्गोरिदमची शक्ती वापरून, डेटा ॲनालिटिक्स आणि विविध माहितीचे स्रोत, सिस्टीमचे उद्दिष्ट एक सूक्ष्म ऑफर करण्याचे आहे. वैयक्तिक विद्यार्थ्यांवर परिणाम करणाऱ्या तणावाच्या घटकांची समज. हे सर्वसमावेशक विश्लेषण संभाव्य ताणतणावांची वेळेवर ओळख करण्यास सक्षम करते, लक्ष्यित करण्यास अनुमती देते.
हे पेटंट पब्लिशिंगसाठी सांघिक कार्य केले गेले आहे. संघा शिवाय हे कार्य करणे शक्य नसते. या संघात महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक आणि बुलढाणा या जिल्ह्यातील तज्ञ व्यक्तींचा समावेश होता. या मध्ये जळगावतून उपप्राचार्य डॉ बी. एच. बऱ्हाटे, , प्रा. हर्षल विश्वनाथ पाटील, डॉ गौरी एम. पाटील, डॉ सचिन एस. कोलते भुसावळ कला विज्ञान आणि पु. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ आणि डॉ वैभव पांडुरंग सोनजे, विभाग प्रमुख, डॉ विपीन बोरोले कॉम्पुटर अँप्लिकेशन, संदीप युनिव्हर्सिटी नाशिक तसेच बुलढाण्याचे प्राचार्य डॉ योगेश पी. पाटील विज्ञान महाविद्यालय, मलकापूर यांनी काम केलेले आहे.
त्यासाठी त्यांना ताप्ती एज्युकेशन सोसायटी भुसावळ चे अध्यक्ष डॉ. मोहन फालक, चेअरमन . महेश फालक, सचिव विष्णु चौधरी, कोषाध्यक्ष संजयकुमार नाहाटा तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.व्ही.पाटील, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ए. डी. गोस्वामी, आणि मुकेश फिरके व विभागातील सर्व सहकारी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.



