भुसावळ – भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या अमृतमहोस्तवी ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त भुसावळ येथे २६ जानेवारीला विश्वशांती फाउंडेशन द्वारा पंढरीनाथ नगर मधील गुरु चंद्रमणी बुद्ध विहार येथे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले . भारतीय संविधान आणि आजची परिस्थिती या विषयावर मुंबई उच्च न्यायालयातील कायदेतज्ञ ऍंडव्होकेट जयमंगल धनराज यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री कायदेतज्ञ ऍंडव्होकेट उज्वल निकम हे होते. आपल्या देशात परकीय लोकांनी येऊन हजारो वर्ष राज्य केले. मात्र संविधानामुळे ७५ वर्षात बाहेरचा एकही येऊ शकला नाही. ही संविधानाची ताकद आहे. बंधुत्व नाही अधिष्ठान तकलादू आहे. भाषावाद प्रांतवाद असल्याने दंगली घडतात. मूलभूत अधिकार माहित आहेत, सोबतच मूलभूत कर्तव्य ही आहेत. सामाजिक सहजीवनाची पद्धत म्हणजे लोकशाही ,समता, बंधुत्व, स्वातंत्र्य हवे, संवेदनशीलते सोबत संविधानशील माणूस निर्माण करावा लागेल. असेही कायदेतज्ञ ऍंडव्होकेट जय मंगल धनराज यांनी आपल्या व्याख्यानातून सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद सपकाळे सर यांनी केले
तसेच प्रास्ताविक विश्वशांती फाउंडेशनचे सचिव एस , एस,केदारे यांनी केले तर आभार बि .डी .जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जी.बी.रायपुरे, डी.बी.हिवरे सर,डॉ. प्राध्यापक संदानशिव सर, संतोष वानखेडे, प्रकाश सरदार, डॉ.गौतम खरे, आनंद शिंदे सर, अनिल पारधे सर,निलेश रायपुरे,सुशील रायपुरे,राजु गुरचळ, यांनी परिश्रम घेतले.




