भुसावळ. — गेल्या अनेक वर्षापासून साईनिर्मल फाउंडेशन , श्री नरेंद्र मोदी विचार मंच च्या व इतर अनेक विविध सामाजिक राजकीय संस्थांच्या माध्यमातूनव इतर विविध संस्थांचे विविध पद भूषवित असलेले सामाजिक, सांस्कृतिक राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले भुसावळ शहरातील समाजसेवक शिशिर दिनकर जावळे यांना राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक क्रांतिकारी सेवा व समर्पित भावनेने विविध क्षेत्रात सेवावृत्ती कार्य केल्याबद्दल तसेच सामाजिक बांधिलकी आणि सामीलकी याची जाण आणि भान ठेवून राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याच त्यांचं कार्य निस्वार्थ सेवेने करीत असल्याबद्दल व त्यांनी जोपासलेला सेवाभावी वृत्तीचा समाजसेवेचा तसेच आदर्श रचनात्मक कार्याचा गौरव व्हावा म्हणून देवकाई प्रतिष्ठान आणि मिताली फाउंडेशन जळगाव यांचेतर्फे महा ग्लोबल राज्यस्तरीय पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आलेला आहे.

राष्ट्रभक्तीची ज्योत तेवत ठेवण्यासाठी हा पुरस्कार तिच्या माध्यमातून राष्ट्रसेवा घडावी या उद्देशाने हा पुरस्कार 21जानेवारी 2024 रोजीजळगाव येथे शिशिर जावळे यांना हा प्रतिष्ठित मानाचा पुरस्कार , जळगाव चे आमदार सुरेश भोळे राजू मामा,महापौर जयश्री महाजन ,उपशिक्षणाधिकारी विजय पवार , खान्देश फेम गायक कलाकार सचिन कुमावत,तसेच सिने क्षेत्रांतील कलाकार तथाप्रोजेक्ट चेअरमन पंकज नाले,यांचे हस्ते व इतर मान्यवरांचे उपस्थीतीत
महा ग्लोबल राज्यस्तरीय पुरस्कार 2024
देऊन सन्मानित करण्यात आले याप्रसंगी
त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे..


