जळगाव, : व्हॉईस ऑफ मिडिया या पत्रकारांच्या राष्ट्रव्यापी संघटने तर्फे दिनांक २७ आणि २८ जानेवारी २०२४ असे दोन दिवसीय
‘व्हॉईस ऑफ मिडिया’च्या प्रमुख असणाऱ्या कोअर टीमच्या पदाधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम जळगाव येथील जैन उद्योग समूहाच्या जैन हिल्स येथे होणार आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन राहणार आहेत.संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदिप काळे हे प्रमुख मार्गदर्शक असतील.

कार्यक्रमाच्या प्रथम दिवशी आमंत्रित मान्यवरांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ होईल.
प्रथम सत्रात दैनिक लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर हे “समाजातील माझी भूमिका व जबाबदारी” या विषयावर आपले मते मांडतील.राज्य विधानपरिषदेचे सदस्य आ.श्रीकांत भारतीय हे “संघटन बांधणी आणि चिरंतन विकास” आणि “लीडरशिप आणि संघटनात्मक बांधणी ” या दोन्ही विषयांवर आपले विचार मांडतील.
दुपारच्या सत्रात ३ वाजता भरत अमळकर हे “समाजसेवा आणि चिरंतर विकास” या विषयावरील आपले मत मांडतील. दीपस्तंभचे यजुवेंद्र महाजन
“निस्वार्थ सेवेची फलश्रुती आणि माणूस म्हणून माझी भूमिका” महामंडलेश्वर संत जनार्दन स्वामी हे “आध्यत्म आणि पत्रकारिता” तर सुनिल कुहीकर है “कृतिशील कार्यक्रमात संशोधनाला का महत्व आहे.” आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे “पत्रकरिता आणि समाजकारण सत्य असत्य ” या विषया वर आपले विचार मांडतील.
२८ जानेवारी सकाळी दहा पासून प्रशिक्षण सत्र पासून सुरू होणार आहे. इंटरनॅशनल स्पीकर आणि ट्रेनर गजेंद्र मेंढी है दोन सत्रात मार्गदर्शन करतील, सायंकाळी पाच वाजता समारोप होईल,असे संघटनेचे विभागीय अध्यक्ष डीगंबर महाले आणि जिल्हाध्यक्ष मिलिंद टोके यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.


