भारतीय बौद्ध महासभेची भुसावळ शहर कार्यकारणीची बैठक

भुसावळ :- येथील शहर कार्यकारणी निवड करण्याबाबत जळगांव जिल्हा पूर्व अंतर्गत भारतीय बौद्ध महासभेची बैठक भुसावळ येथील शीलरत्न विहार, सात नंबर पोलीस चौकी चांदमारी चाळ, भुसावळ येथे दि.28/01/24 रविवारी रोजी दुपारी 12:00 वाजता आयोजित करण्यात आली आहे. सदरची बैठकीत जिल्हा कार्यकारणी पदाधिकारीच्या उपस्थितीत भुसावळ शहर कार्यकारीची निवड करण्यात येणार आहे. तरी सर्व बौद्ध उपासक व उपासिका, श्रामनेर-बोद्धचार्य, केंद्रीय शिक्षक, समता सैनिक दलाचे सैनिक यांनी या बैठकीला आवर्जून उपस्थितीत राहावे. या बैठकीस राज्य संघटक के. वाय. सुरवाडे, नाशिक विभागीय प्रभारी लता तायडे,जिल्हा सरचिटणीस सुशिकुमार हिवाळे, कोषाध्यक्ष शैलेंद्र जाधव, जिल्हा संघटक प्रकाश सरदार, हिशोब तपासणीस सुमंगल अहिरे,ए. टी. सुरळकर यांच्या सह लेफ्ट कर्नल युवराज नरवाडे, उपाध्यक्ष संरक्षण रमेश साळवे, सचिव संरक्षण सुरेश जोहरे, सचिव प्रचार व पर्यटन वसंत लोखंडे, महिला जिल्हा अध्यक्षा प्रियंका अहिरे, सरचिटणीस वैशाली सरदार,संघटक वनमाला हिवाळे, उपाध्यक्ष संस्कार सुमित्रा सर्वटकर, यांच्या सह जिल्हा कार्यकारणीचे प्रामुख पदाधिकारी उपस्थितीत राहणार आहे. . तरी जास्तीतजास्त बौद्ध बांधवानी या बैठकीला उपस्थित राहण्याचे आव्हान भुसावळ तालुका अध्यक्ष उत्तमराव सुरवाडे, ता.सरचिटणीस अरुण तायडे, कोषध्यक्ष कैलास सपकाळे, उपाध्यक्ष संस्कार आनंदमित्र सपकाळे यांनी केले आहे.