. भुसावळ – येथील डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कुल चे स्नेहसंमेलन २०२४ ‘डियुपीईएमएस ऑडसी’ चे उद्घाटन दि १२ रोजी मध्य रेल्वे भुसावळ विभागाच्या अधिक्षक इती पांडे यांच्या हस्ते झाले.
यावेळी गोदावरी फौडेशनचे अध्यक्ष माजी खा.डॉ.उल्हास पाटील,सचिव डॉ.वर्षा पाटील, डॉ.वैभव पाटील,प्रिन्सीपल अनघा पाटील,डॉ.उल्हास पाटील मेडीकल कॉलेज अॅन्ड हॉस्पीटल चे डीन डॉ.प्रशांत सोलंकी,सुप्रीन्टेडंन्ट डॉ.प्रेमचंद पंडीत यावेळी उपस्थीत होते,
यावेळी विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर नृत्य व ,नाट्य,सादर करून आपल्यातील कलागुण सांस्कृतीक कार्यक्रमाचे माध्यमातून सादर करून सर्व उपस्थीतांचे मने जिंकली. पालकांनी व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी शाळेतील शेकडो विद्यार्थांनी सहभाग नोंदवला, शाळेच्या इमारतीवर विद्यूत रोषणाई करण्यात आली होती.

याप्रसंगी डीआरएम इती पांडे व डॉ. उल्हास पाटील डॉ. वर्षा पाटील यांनी मार्गदर्शन केले. डॉ उल्हास पाटील म्हणाले की भुसावळातील सीबीएससी चे ज्युनिअर कॉलेज असलेले ही पहिली एकमेव शाळा आहे. गेल्या 23 वर्षापासून ही संस्था सुरू आहे. आणि या संस्थेमधून शिकून गेलेले विद्यार्थी हे पुढे आयआयटी, इंजिनियर व इतर मोठे अधिकारी झाले. डीआरएम इती पांडे म्हणाले की विदयार्थ्यांनी अभ्यास करुरू खेळले ही पाहीजे, खेळल्याने आपल्या शरीरातील ऑक्सीजन वाढतो, खेळ तुम्हाला जिंकणे व हारणे शिकवतो,तुमची संस्या ही नावाजलेली संस्था आहे येथून खुप चांगले विदयार्थी घडून गेले असतील. अतिशय चांगल्या वातावरणामध्ये असलेली ही शाळा पुढे अजून चांगले विद्यार्थी घडविल. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व कर्मच्याऱ्यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन पुनम कुंडु व स्मिता भोलाणे यांनी केले.
फोटो कॅप्शन –
*फोटो कॅप्शन – भुसावळातील डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये स्नेहसंमेलना प्रसंगी द्वीपप्रज्वलन करताना डी आर एम इती पांडे सोबत डॉ. उल्हास पाटील,अनघा पाटील आदी.*
भुसावळातील डॉ उल्हास पाटील इग्लीश मिडीयम स्कुल मध्ये स्नेहसम्मेलनात थिरकतांना विद्यार्थी.



