मुंबई पॅसेंजर आरक्षण व्यवस्था दि. १४/१५जानेवारी रोजी मध्यरात्री देखभालीसाठी बंद राहील :

मुंबई – मुंबई पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टीम (पीआरएस) देखभालीसाठी बंद राहील आणि दि. १४.०१.२०२४ च्या रात्री ११.४५ ते दि. १५.०१.२०२४ च्या सकाळी ०५.१५ पर्यंत डिस्क डी-फ्रॅगमेंटेशनमधून जाईल. याचा परिणाम भारतीय रेल्वेवरील सर्व झोनवर होईल.

यामुळे, आईव्हिआरएस, चालू आरक्षण, रिफंड काउंटर आणि कोचिंग रिफंड टर्मिनल्सच्या सेवा उपलब्ध होणार नाहीत. तथापि, तिकिट ठेव पावती (टीडीआर) परताव्यासाठी विद्यमान परतावा नियमांनुसार जारी केली जाईल.

मुंबई पीआरएस गाड्यांसाठी आईआरसीटीसी (IRCTC) द्वारे इंटरनेट बुकिंग वर नमूद केलेल्या कालावधीत उपलब्ध होणार नाही.

प्रवासी/रेल्‍वे वापरकर्त्‍यांनी या महत्‍त्‍वाच्‍या देखभाल करण्‍याच्‍या कामासाठी सहकार्य करावे अशी विनंती रेल्‍वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.