भुसावळात नॉयलॉन मांजा जप्त :

भुसावळ – मकर संक्रांती निमित्त शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर पतंग उडवण्यात येतात .या पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणारा मांजा अनेक जण नॉयलॉनचा वापरतात .यामुळे अनेक दुर्घटना होण्याचा संभव असतो याकरिता काही दुकानदार हे चोरून नॉयलॉन मांज्याची विक्री करतात .

शहरातील आदर्श शाळेजवळ सिंधी कॉलनी येथे ११ रोजी करण दिलीप कुमार लुल्ला वय २२ हा नायलॉन मांजा विक्री करताना आढळून आला . त्याच्याविरुद्ध बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.