भुसावळ – जबलपूर विभागातील इटारसी-जबलपूर दरम्यान भिटोनी स्थानकात नॉन-इंटरलॉकिंगचे कार्य करीता काही एक्सप्रेस गाडी मध्ये बदल करण्यात आला आहे. भुसावळ विभागातून धावणाऱ्या गाड्यांवर पुढीलप्रमाणे परिणाम होणार आहे. यात
1) ट्रेन क्रमांक 19013 भुसावळ-कटनी एक्स्प्रेस प्रवास सुरु दिनांक 14.01.2024 ते 17.01.2024 पर्यंत इटारसी स्थानकापर्यंत शॉर्ट टर्मिनेट करण्यात आली आहे. ट्रेन इटारसी ते कटनी स्थानकादरम्यान रद्द राहील.
2) ट्रेन क्रमांक 19014 कटनी-भुसावळ एक्स्प्रेस प्रवास सुरु दिनांक 14.01.2024 ते 17.01.2024 पर्यंत इटारसी स्थानकातून आपल्या नियोजित वेळेत सुटेल. ट्रेन कटनी-इटारसी स्थानकादरम्यान रद्द राहील.
प्रवाशांना आवाहन करण्यात येत आहे कि त्यांनी या बदलाकडे लक्ष द्यावे आणि त्याची नोंद घ्यावी.



