नाहाटा महाविद्यालयात युवक दिन साजरा :

भुसावळ –
राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त भुसावळ येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात युवक दिन साजरा करण्यात आला. दरवर्षी १२ जानेवारी हा युवक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याचेच औचित्य साधून महाविद्यालयातील एन, सी. सी. विभाग, एन. एस. एस. विभाग आणि स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा दिवस साजरा करण्यात आला.

या प्रसंगी भारतीय वायूदलाचे निवृत्त एअर व्हाईस मार्शल सूर्यकांतजी चाफेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
राजमाता जिजाऊंनी आपल्या मूल्य संस्कारांमधून शिवछत्रपती शिवाजी महाराजांसारखा महापुरुष घडविला आणि स्वामी विवेकानंद यांनी भारतीय संस्कृती शिकवणूकीतून युवकांना प्रोत्साहित केले. यातून प्रेरणा घेऊन महाविद्यालयातर्फे दरवर्षी युवक युवतींसाठी सक्षम भारतीय नागरिक घडविण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. महाविद्यालयातील एनसीसी, एनएसएस आणि स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिपठानतर्फे भारतीय वायुसेनेचे निवृत्त एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर यांचे मार्गदर्शन आयोजित केले होते.
आपल्या मार्गदर्शनामध्ये श्री. चाफेकर यांनी हिमालयात सुमारे १६७०० फूट उंचीवर अत्यंत कठीण परिस्थितीत पहिल्यांदा विमान उतरण्याचा अनुभव दृक श्राव्य माध्यमांद्वारे कथन केला. राष्ट्रप्रेमासाठी त्यांनी विद्यार्थ्याना प्रोत्साहित केले तसेच सरकारच्या नवीन अग्निदीर संकल्पनेबाबत मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनात डॉ आर एस नाडेकर यांनी स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या शिकवणूकी बद्दल मार्गदर्शन केले. या प्रसंगी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. मोहनभाऊ फालक, उपप्राचार्य डॉ. बी एच बऱ्हाटे, डॉ. जी आर वाणी, डॉ के के अहिरे, डॉ एस् पी झनके, डॉ एस एस चौधरी, संगणक विभागातील विनय चौधरी, किशोर नारखेडे व एनएस एस, एनसीसीचे विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी लेफ्ट. डी एन पाटील, डॉ आर एस नाडेकर, डॉ विलास महिरे, डॉ ममनाबेन पाटील यांनी परिश्रम घेतले.