भुसावळ – केंद्र सरकारने नुकताच लागू केलेला हिट अँड रन हा जुलमी कायदा त्वरित रद्द करावा यासाठी भुसावळ येथे विविध संघटनांतर्फे आंदोलन करण्यात आले आहे

या आंदोलनात संघर्ष चालक-मालक संघटना , जय भवानी मॅडडोर संघटना , ऑटो रिक्षा चालक संघटना यांचेसह अन्य विविध संघटनांचा सहभाग होता
भुसावळ येथील नाहटा कॉलेज चौफुली जवळ घोषणाबाजी करून निदर्शने करण्यात आली मागणीचे निवेदन बाजारपेठ पोलीस स्टेशनला देण्यात आले आहे .
यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले कि आमचा लढा जनतेशी नसून सरकार सोबत असल्याने कोणताही उद्रेक न करता शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत आहोत वाहने बंद ठेवून हिट अँड रन कायद्याचा विरोध करणार असल्याचेही यावेळी सांगीतले


