भुसावळातील घराफोडीचा गुन्हा डिटेक्ट : दोघा आरोपींसह दोन लाखाचा मुद्देमाल हस्तगत : बाजारपेठ पोलिसांची कामगीरी :


भुसावळ – येथील जामनेर रोड वरील हॉटेल प्रिमियमच्या पाठीमागील साकेत सोसायटी मधील रहिवासी शिक्षक महेश लोटनगीर गोसावी, वय – 41 हे ऑगस्ट महिन्यात 29 ते 31 दरम्यान बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी घराचा कुलूप कोंडा तोडून घरातील सोन्याचांदीचे दागिने असा एकूण 2 लाख रुपये किमतीचा माल चोरून पोबारा केला होता .याबाबत शहरातील बाजारपेठ पो.स्टे. येथे दाखल गुन्ह्यातील फिर्यादी महेश लोटनगीर गोसावी, यांनी तक्रार दिली होती . या गुन्ह्याचा तपास बाजारपेठ पोलीस कसून तपास करीत होते दरम्यान अवघ्या 4 महिन्यात 12 जानेवारी रोजी याप्रकरणी दोघा आरोपीना 2 लाख मुद्देमालासह ताब्यात घेण्यात बाजारपेठ पोलिसांना यश आले आहे .

यात आरोपी शाकीर ऊर्फ गोलु सय्यद राशीद उस्माने, वय 26 मुस्लीम कॉलनी ,मशीद जवळ भुसावळ, व मुस्तफा मंजुर पिंजारी वय 23, खडका रोड, बडी खानका भुसावळ या दोघांना
तांत्रीक तपास करून तसेच गोपनीय बातमीदारा मार्फत माहीती मिळवून अटक केली आहे .
या दोघा आरोपी कडून गुन्हयात चोरी गेलेला संपुर्ण माल हस्तगत
केला आहे यामध्ये १,५०,०००/-रु. किं ची एक 27 ग्रॅम सोन्याची पोत.
, ५०,०००/- रु. किं चे सोन्याची लगड. 10 ग्रॅम वजनाची एकून 37 ग्रॅम
असे गुन्हयात चोरी गेलेला १००% मुद्देमाल एकुण दोन लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात
आलेला आहे.


या गुन्हयाचा तपास पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधिक्षक
अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ
पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पो. निरीक्षक हरीष
भोये, पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव, पोहेकॉ/ विजय नेरकर, पोहेकॉ/ यासीन पिंजारी, पोहेकॉ/महेश चौधरी,
पोहेकॉ/समाधान पाटील, पोहेकॉ/ रमन सुरळकर, पोहेकॉ/ उमाकांत पाटील, पोहेकॉ/निलेश चौधरी, पोकॉ/सचिन
चौधरी, पोकॉ/जावेद शहा, पोकॉ/प्रशांत परदेशी, पोकॉ/योगेश माळी, पोकॉ/राहुल वाणखेडे, पोकॉ/अमर अढाळे यांनी केला .