यावल : श्री गजानन महाराज फाऊंडेशन साकळी मित्र मंडळातर्फे साकळी श्री गजानन महाराज देवस्थान जोशी फार्म साकळी येथून ७ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता श्रीक्षेत्र शेगांव येथे पदयात्रा पालखी रवाना झाली. यंदा पालखी सोहळ्याचे १३ वर्ष असून ही पालखी श्री गजानन महाराज देवस्थान जोशी फार्म मनवेल रोड साकळी
येथून निघाली
पालखी अंजाळे तालुका यावल येथे आल्यानंतर पालखीचे स्वागत करण्यात आले. यावेळी पदयात्रेतील सहभागी भाविकांना मनवेल येथील सामाजिक कार्यकर्ते व माऊली एग्रो चे संचालक भरत रामसिंग पाटील यांच्याकडून एकादशी असल्याने उपवासाचा फराळ देण्यात आला. यानंतर गजानन महाराज यांची पालखी पुढील मार्गावर रवाना झाली
अंजाळे तालुका यावल येथील प्रसिद्ध शनिमंदिर येथे दर्शन घेतल्यानंतर सहभागी भाविकांनी फराळाचा आनंद घेतला

अन्नदान करुन करावे जिवनाचे सार्थक माऊली एग्रो चे संचालक भरत पाटील
आपल्याला हा सुंदर असा नरदेह देऊन भगवंताने आपल्यावर उपकार केले आहे म्हणून आपण ही अन्नदान करुन या जिवनाचे सार्थक करावे यासाठी दरवर्षी तिनं ठिकाणी पायी पदयात्रे ठिकाणी अन्नदान करत असतो त्यात साकळी ते गजानन महाराज शेगांव
श्री ज्ञानेश्वर माऊली आळंदी ते पंढरपुर
लमाजन ते शिर्डी साईबाबा पदयात्रा अश्या एकुण तीन ठिकाणी अन्नदान करत असतो अन्नदान करत असताना मनस्वी आनंद होतो


