भुसावळ नवीन जिल्हा : महाराष्ट्रातून नवीन २२ जिल्ह्यांचा निर्णय :

भुसावळ -महाराष्ट्र सरकारने राज्यात २२ नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातून एकूण जिल्ह्याची संख्या ३६वरून ५८ होईल यामध्ये नाशिक, पालघर, अहमदनगर, ठाणे, पुणे ,रायगड, सातारा, रत्नागिरी, बीड ,लातूर, नांदेड, जळगाव, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर ,आणि गडचिरोली या जिल्ह्याची विभागणी करून नवीन जिल्हे तयार करण्यात येणार आहे, यामध्ये भुसावळ तालुक्याचीही जिल्हा निर्मिती होत आहे या निर्णयाचे स्वागत राज्यातील अनेक नेत्यांनी केले आहे .त्यांनी या निर्णयामुळे राज्यातील प्रशासकीय कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल. आणि नागरिकांना प्रशासनापर्यंत पोहोचण्यास सोपे होईल असे म्हटले आहे.