क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती साजरी : अभिवादन स्वरूपात शैक्षणिक साहित्य संकलन :

भुसावळ – राजेश्री संघमित्रा महिला सामाजिक बहुउद्देशीय फाउंडेशन भुसावळ तर्फे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९३ वी जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम व अभिवादन स्वरूपात शैक्षणिक साहित्य संकलन करण्यात आले कार्यक्रम दि . ३ जानेवारी २०२४ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान भुसावळ येथे घेण्यात आला.सुरवातीला आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते फीत कापून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक गजानन पडघन , सरकारी वकील ॲड.नितिन खरे , पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रेम परदेशी , माजी.नगरसेवक राजेंद्र आवटे , भारतीय जनता अनुसूचित जाती मोर्चा शहराध्यक्ष राहुल तायडे ,भाजपा उत्तर भारतीय आघाडी शहराध्यक्ष वेद ओझा सर , सिव्हील इंजिनिअर राजेश चंदन सर,समाजसेविका( तृतीयपंथी ) चांद तडवी यांची उपस्थिती होती.नंतर आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे फुलहार अर्पण करून अभिवादन केले दरम्यान उपस्थित सर्व मान्यवरांनी द्विप प्रज्वलित करून सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले. उपस्थित सर्व मान्यवरांना स्वागत करतांना १ पेन व डायरी भेट दिली.फाउंडेशन अध्यक्ष राजेश्री सुरवाडे व सर्व पदाधिकारी महिला यांनी फाउंडेशन अंतर्गत मागिल ८ वर्षा पासून राबविण्यात येत असलेला या उपक्रमाची माहिती दिली. दरम्यान फाउंडेशन अंतर्गत राबविण्यात येणा-या सेवाभावी व निस्वार्थ कार्याची दखल घेत भारतीय जनता अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ शहराच्या वतीने भुसावळ चे माजी.पालकमंत्री तथा विद्यमान आमदार संजयभाऊ सावकारे व अनुसुचित जाती मोर्चा शहराध्यक्ष राहुल तायडे यांच्या हस्ते सर्व मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये फाउंडेशन अध्यक्ष राजेश्री सुरवाडे यांना भारतीय संविधान प्रत भेट देऊन सन्मानित करण्यात आले. यानंतर शहर पोलिस स्टेशन चे निरिक्षक गजानन पडघन सर, माजी.नगरसेवक राजेंद्र आवटे नाना, सिव्हील इंजिनिअर राजेश चंदन सर , अनुसूचित जाती मोर्चा शहराध्यक्ष राहुल तायडे , भुसावळ खालसा हाॅटेल चे छोटु सारंग पाटील ,भाजपा उत्तर भारतीय शहराध्यक्ष वेद ओझा , महिला समुपदेशन केंद्र भुसावळ महिला काॅन्सीलर भारती रंधे- म्हस्के मॅडम, जिल्हा महिला सल्लागार समिती सदस्य जळगाव निवेदिता तायडे , ॲड.रमेश पांडव सर, जळगाव जनता बैंक उपप्रबंधक अनिल खरे सर, महिला मुक्ती मोर्चा संगिता भामरे ,समाजसेविका संध्या चंदेल समाजसेविका वंदना सोनवणे , मयुर सुरवाडे , फाउंडेशन सचिव निर्मला सुरवाडे, भुसावळ येथील मामा काॅटर्स चे देविदास सुरवाडे नितीन धांडे राष्ट्रवादी शहराध्यक्ष भुसावळ,देवा वाणी माजी.नगरसेवक आदींनी अभिवादन स्वरूपात शैक्षणिक साहित्य देऊन मदतीचा हात दिला.

सदर कार्यक्रम हा सकाळी ११ वाजे पासुन ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत होता दरम्यान दिवसभरात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी येऊन अभिवादन स्वरूपात शैक्षणिक साहित्य देऊन जमा झालेले साहित्य – २० शाळेची बॅग, २० भरलेली कंपास, ११९ पेन, २०० पेजेस ६९ वह्या, १०० पेजेस २२ रजिस्टर, ६ फोल्डर फाईल.आदी साहित्य संकलन झाले असून कहिंनी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आर्थिक मदत दिली होती.उपक्रमा अंती काही शैक्षणिक साहित्याची आवश्यकता असल्याचे आमदार सावकारे देतील असे त्यांनी सांगितले.संकलन झालेले साहित्य बहुजन समाजातील ज्यांचे आई वडिल नाही अशा विद्यार्थ्यांनी व ज्यांची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे अशा कुटुंबातील विद्यार्थ्यांनी यांना फाउंडेशन संचालित अवनी दत्तक योजना अंतर्गत वितरण करण्यात येणार असल्याचे फाउंडेशन अध्यक्ष राजेश्री सुरवाडे यांनी सांगितले व उपक्रमात शैक्षणिक साहित्य देऊन मदतीचा हात दिला यासाठी सर्वांचे आभार मानले व अशीच मदर आमच्या सेवाभावी निस्वार्थ कार्याला अशीच मदत करावी आशा व्येक्त केली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फाउंडेशन अध्यक्ष राजेश्री सुरवाडे, सचिव निर्मला सुरवाडे, सहसचिव शैला तायडे , सुजाता सपकाळे,आशा पठारे यांनी परिश्रम घेतले.