भुसावळ – समाजातील खर्चिक लग्न पध्दतीला आळा बसावा, व चुकीच्या पध्दती बंद व्हाव्या या उद्देशाने गेल्या 8 वर्षांपासून भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखे तर्फे सामूहिक विवाह घेण्यात येत आहे . यंदा सुद्धा आठवा सामुहिक विवाहात 12 जोडपी विवाहबद्ध झाले.
दि. 6 जानेवारी 2024 रोजी संतोषीमाता हॉल येथे भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखे तर्फे आठव्यांदा सामुहिक विवाहाचे आयोजन करण्यात आले होते
या विवाहासाठी समाजातील मान्यवर प्रतिष्ठित लोक हजर होते.
सर्व प्रथम उपक्रम चेअरमन आरती चौधरी यांनी विवाहबद्ध होणाऱ्या मुला मुलींचे विवाहपूर्व समुपदेशन केले.
नंतर विवाह विधींची सुरवात झाली.
या विवाहासाठी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे उपस्थित होते. तसेच भावी कुटुंबनायक ललीत पाटील, उपस्थित होते. प्रसंगी संभाजीनगरहून आलेले उद्योगपती वसंत पाटील, किरण महाजन, चंद्रकांत चौधरी, मनिष चौधरी, भंगाळे गोल्डचे भागवत भंगाळे, अरूण बोरोले, यांचा सत्कार केला.
प्रस्ताविक आरती चौधरी यांनी केले यात भुसावळ भोरगाव लेवापंचायतच्या कार्यक्रमां विषयी माहिती दिली व समाजातील खर्चिक लग्न पध्दतीला आळा बसावा, व चुकीच्या पध्दती बंद व्हाव्या म्हणून हा सोहळा आम्ही घेत आहोत हे सांगितले.
एकनाथ खडसे यांनी सामुहिक विवाह ही काळाची गरज आहे असे सांगितले व अशा विवाहासाठी सगळ्यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे हे सांगितले.
नवविवाहित दांपत्यास गॅस शेगडी, सिलेंडर, मिक्सर, कुकर, देवाची भांडे, कपडे, शालू, जोडवी, मंगळसुत्र , देण्यात आले.
मामा पाचपांडे यांनी त्यांच्या पत्नीच्या स्मरणार्थ गजानन महाराजांचे ग्रंथ देण्यात आले.
विवाहासाठी भुसावळ भोरगाव लेवा पंचायतचे अध्यक्ष अँड. प्रकाश पाटील, सचिव डाॅ. बाळू पाटील,महेश फालक , आरती चौधरी, चेतन पाटील, परिक्षीत ब-हाटे, मंगला पाटील, स्वाती भोळे, शरद फेगडे, माजी आमदार निळकंठ फालक फालक, दिगंबर महाजन, आर. जी. चौधरी, अनिल वराडे हजर होते.
जळगावचे डॉ. मिलींद पाटील हजर होते.
सुत्रसंचलन चेतन पाटील यांनी केले.
शालीनी पाटील, अर्चना पाटील, कल्पना फालक, उज्ज्वला महाजन, डाॅ. मृणाल पाटील, नीला चौधरी, यांची उपस्थिती होती.
उल्हास पाटील, जगदीश फिरके, यांनी परीश्रम घेतले. यावेळी अनेक प्रतिष्ठित लोक हजर होते.



