वरणगाव -स्त्री शिक्षणाचे शिल्पकार आई सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त वरणगाव पोलिस स्टेशन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सपोनि भरत चौधरी, दिपाली चौधरी , चंद्रकांत बढे सर , राजेंद्र चौधरी , प्रशांत नागरे , सुनिल शेठे आदी मान्य वराच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेचे पूजन करून दिपप्रज्वलन करण्यात आले. तसेच गोरगरीब व दिव्यांग महिला ना साडी चोळी तसेच विद्यार्थ्याना शेक्षणीक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राच्या दिनेश गवळी सर व दिपाली सुरवाडे मॅडम बचत गटाच्या महिलांना रोजगार निर्मिती संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.



