भुसावळ – येथील भुसावळ कला, विज्ञान, आणि पी. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात युवती कल्याण समितीतर्फे “क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९२व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन” कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. बी. एच. बऱ्हाटे होते.
प्रा. डॉ. स्मिता चौधरी यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवनकार्य या विषयांवर माहिती दिली. आपल्या भाषणामध्ये त्यांनी सावित्री बाईंनी आधी स्वतः आपले पती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कडून शिक्षण घेत कशा असंख्य अडचणीवर मात करत स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवली याचे वर्णन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवती कल्याण समिती प्रमुख प्रा. डॉ. गौरी पाटील यांनी केले तसेच उपस्थितांचे आभारदेखील मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. सौ. विद्या पाटील, प्रा. डॉ. सौ स्वाती फालक, प्रा. स्मिता बेंडाळे, प्रा. पूनम महाजन, प्रा. संगीता भिरुड यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व विद्यार्थीनी उपस्थित होत्या.



