भुसावळ – दर वर्षी डिसेंबर महिन्याचा उत्तरार्ध सुरू होताच नव वर्षाच्या आगमनाची चाहूल लागते नवं वर्ष उत्साहाने स्वागत केले जाते.त्यात आणखी एका गोष्टीचे अप्रूप असते व ती म्हणजे नव्या वर्षाचे कॅलेंडर!काळानुरूप त्यात ही खूप बदल झाले आहेत.पण तरीही साधारण पणे कॅलेंडर ला किमान सहा पान असतातच.ते भिंतीवर ठेवण्यासाठी उपयुक्त असेल तरी प्रत्येक महिना सुरू झाला की पान बदलावे लागते.ही गैरसोय दूर करून एकाच पानात पूर्ण वर्षाचे कॅलेंडर तयार केले तर!अशी कल्पना येथील उपक्रमशील शिक्षक प्र.ह.दलाल यांचे मनात आली आणि त्यांनी ही अभिनव दिनदर्शिका तयार केली

एकच पानात पूर्ण वर्षाचे कॅलेंडर!खिशात पर्स पाकीट यात टेबल खाली सहज हाताळायला सोपी अगदी आय कार्ड स्वरूपातही करता येणारी ही दिनदर्शिका सुमारे वीस वर्षांपासून दलाल सर प्रत्येक वर्षी तयार करून वाचकांना उपलब्ध करून देतात विशेष म्हणजे एकाच पानात दहा पंधरा वर्षांच् कॅलेंडर ही त्यांनी केले आहे त्यामुळे मागील काही अन् पुढील काही वर्षांचे कॅलेंडर पाहता येते मागील व पुढील काही वर्षांच्या कोणत्याही महिन्याच्या तारखा सहज पाहता येतात सरांच्या ह्या उपक्रमांचे अनेकांनी कौतुक व स्वागत केले आहे आपल्या वाचकांसाठी ही दिनदर्शिका देत आहोत.



