जामनेर – ३१/१२/२०२३ रोजी श्री संत संताजी जगनाडे महाराज तेली समाज जनसेवा बहुउद्देशीय संस्था जामनेर यांच्या वतीने ना. गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन जामनेर नगरीच्या लोकनियुक्त माजी नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच जामनेर तालुक्यातील कार्यकारिणी सुद्धा जाहीर करण्यात आली. जामनेर तालुक्यासह शहरातील सर्व समाज बांधव एकत्र येऊन हा प्रकाशन सोहळा पार पडला.

याप्रसंगी अजय चौधरी, निलेश पाटील, तालुका सचिव निलेश चौधरी, खजिनदार सोपान चौधरी, तालुका उपाध्यक्ष विकास चौधरी, सहसचिव संतोष चौधरी, मार्गदर्शक अविनाश चौधरी, संघटक प्रमुख वासुदेव चौधरी, सहकार्याध्यक्ष संतोष पाटील, सदस्य प्रा. डॉक्टर योगिता चौधरी, मार्गदर्शक ह. भ. प. जान्हवी संतोष सोनवणे, प्रणाली चौधरी कार्याध्यक्ष तेजस चौधरी, युवा संघटक श्रीमती स्वाती चौधरी, सदस्य माधुरी चौधरी, सदस्य संतोष चौधरी, किरण चौधरी सोशल मीडिया प्रसिद्धीप्रमुख, तालुकाध्यक्ष जी. एस.चौधरी, सल्लागार रमण चौधरी, मार्गदर्शक एड. नाना चौधरी, कायदे तज्ञ सल्लागार एड. विकास चौधरी, कायदे तज्ञ सहसल्लागार प्रकाश माणिकराव पाटील, गारखेडा सहसल्लागार डॉ. योगेश सरताळे, यांच्या सह मार्गदर्शक संजय जगन्नाथ चौधरी, (ओझर) संतोष रमेश चौधरी, (शेंदुर्णी) गोपाल चौधरी, अविनाश चौधरी, योगेश चौधरी, श्रीकृष्ण चौधरी, आदी समाज बांधव यांची श्री.संत जगनाडे महाराजां यांची प्रतिमा शाल व पुष्पगुच्छ देऊन कार्यकारणीत नियुक्ती करण्यात आली. तसेच संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे प्रतिमा पूजन करण्यात आले. आलेल्या मान्यवरांनी तेली समाजाविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यात सर्व समाज बांधव या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.


