बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये वार्षिक शालेय क्रीडा महोत्सवाचे थाटात उद्घघाटन :


भुसावळ
२५ डिसेंबर २०२३ रोजी बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये वार्षिक शालेय क्रीडा स्पर्धांचे उद्घघाटन झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते शालेय ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी शाळेच्या ९०० विद्यार्थ्यांनी शालेय ध्वज व मान्यवरांना उत्कृष्ट पथसंचलन करीत मानवंदना दिली.
दोन दिवस चालणाऱ्या या क्रीडा महोत्सवात विविध क्रीडा प्रकारात शाळेचे सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी सहभागी होत आहेत. यात धावण्याच्या शर्यतीत 100 मीटर,200,400,800,1500 व 3000 मीटर तसेच रिले रेस इत्यादी.तसेच उंच उडी,लांब उडी,गोळा फेक,भालाफेक, थाळीफेक आदी क्रीडा स्पर्धा होणार आहे.
कार्यक्रमाच्या उद्घघाटन प्रसंगी बियाणी एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष मनोज बियाणी हे अध्यक्ष स्थानी होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून के नारखेडे विद्यालय व जुनिअर कॉलेजचे प्राचार्य एन बी किनगे व बियाणी एज्युकेशन ग्रुपच्या सचिव डॉ.संगीता बियाणी हे उपस्थित होते. या वेळी राजीव पारीख व बियाणी स्कूलचे प्राचार्य रुद्रासेन गऺठिया उपस्थित होते.
प्रमुख अतिथी किनगे सर यांनी आपल्या भाषणातून खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सांघिक भावना व खेळाडू वृत्तीचा विकास साधला जातो अशा प्रकारे खेळाचे महत्व विशद करीत त्यांनी खेळाडूंना प्रोत्साहन दिले.
मान्यवरांचे हस्ते 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेचे हिरवा झेंडा दाखवून उद्घघाटन करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शाळेचे प्राचार्य डी एम पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.
फोटो – मशाल ज्योत पेटवून उद्घाटन करताना एन बी किरंगे सोबत मनोज बियाणी,डॉ संगीता बियाणी,प्रिन्सिपल डी. एम.पाटील,रुद्रसेन गंठिया राजीव पारिक आदी.