शिवसेना ठाकरे गटाची उद्या जळगावात तातडीची बैठक : जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख संजय सावंत करणार मार्गदर्शन :

भुसावळ –
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे व नेते खा संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक येथे दि 23/01/2024 रोजी होत असलेल्या मेळाव्याच्या अनुषंगाने जळगाव जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्या अध्यक्षतेखाली दि. 27/12/2023 बुधवार रोजी दुपारी 12 वाजता सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवन आंबेडकर मार्केट जवळ जळगांव येथे आयोजीत करण्यात आली आहे .

तरी सर्व जिल्हा पदाधिकारी, सर्व तालुका पदाधिकारी, सर्व महिला आघाडी पदाधिकारी, सर्व युवासेना पदाधिकारी, अल्पसंख्यांक आघाडी पदाधिकारी, सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी तसेच सर्व शिवसैनिक यांनी सदर बैठकीस उपस्थित रहावे असे आवाहन गुलाबराव वाघ सह संपर्क प्रमुख
विष्णू रामदास भंगाळे , जिल्हा प्रमुख
दिपक राजपूत , जिल्हा प्रमुख
डॉ हर्षल माने , जिल्हा प्रमुख
शरद तायडे , महानगर प्रमुख सौ
महानंदा पाटील , महिला आघाडी जिल्हा प्रमुख
रोहिणी पाटील , सौ.
पूनम बऱ्हाटे महिला आघाडी प्रमुख व युवा सेना यांच्यातर्फे करण्यात आले आहे