राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भुसावळ तालुक्याच्यावतीने उद्या निषेध मोर्चा :

भुसावळ – कांदा निर्यात बंदी थांबावणे तसेच शेतमालाला भाव न देता शेती साठी आवश्यक वस्तूंची भाववाढ करणे यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भुसावळ तालुक्याच्या वतीने 27.12.2023 बुधवार रोजी दुपारी 1 वाजता तहसील कार्यालया समोर महात्मा गांधी पुतळ्या पासून चालत येऊन पायी मोर्चा काढून निषेध व्यक्त केला जाणार आहे

तरी सर्व शेतकरी बांधवांनी दुपारी 12.30 वा भुसावळ तहसील येथे मोठ्या प्रमाणात उपस्थित रहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष दिपक मराठे व सर्व सेलचे तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी केले आहे .