भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेतर्फे नुतन वर्षाच्या प्रारंभी सामुहीक विवाह सोहळ्याचे आयोजन :


भुसावळ – भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेच्या संचालकांच्या उपस्थितीत नुकतीच बैठक घेण्यात आली . अँड. प्रकाश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दि. ६ जानेवारी २०२४ शनिवार रोजी आठवा सामुहिक विवाह सोहळा संतोषीमाता हॉल, प्रोफेसर काॅलनी येथे सकाळी ११.३२ मिनीटांनी कुटुंबनायक रमेशदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होईल असे ठरविण्यात आले
विवाहाच्या वेळी वधुवरांना ड्रेस, शालू, आंदण, गॅस शेगडी, सिलेंडर, कुकर, मिक्सर व इतर संसारोपयोगी वस्तू देण्यात येणार आहेत.
या सामुहीक विवाह सोहळ्याला मा . एकनाथराव खडसे यांनी विशेष मदत दिली आहे तसेच शाखचे संचालक महेश फालक यांनी सुद्धा संस्थेला विशेष मदत केली आहे.
या वेळी भुसावळ शाखेचे अध्यक्ष अँड. प्रकाश पाटील, सचिव डाॅ. बाळू पाटील, चेअरमन आरती चौधरी, महेश फालक, शरद फेगडे, मंगला पाटील, स्वाती भोळे, चेतन पाटील, आर. जी. चौधरी उपस्थित होते.
नोंदणी करीता अँड. प्रकाश पाटील निसर्गप्लाझा जामनेर रोड, पांडुरंग टॉकीज जवळ, आरती चौधरी, सोनीच्छा वाडी जामनेर रोड, यांचेकडे संपर्क करावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
हा सामुहीक विवाह सोहळा कुटुंबनायक रमेशदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.