भुसावळातील रामायण नगरात धाडसी घरफोडी : पाच लाखांचा ऐवज लंपास –

भुसावळातील रामायण नगरात धाडसी घरफोडी : पाच लाखांचा ऐवज लंपास –

भुसावळ : शहरातील वरणगाव रोडवरील कंटेनर डेपो जवळील रामायण नगरातील बंद घरातून चोरट्यांनी तब्बल पाच लाख 21 हजारांचे दागिणे लांबवल्याचा प्रकार समोर आला असून धाडसी घरफोडीने खळबळ उडाली आहे. ही घरफोडी रविवार, 17 रोजी झाली.
रामायण नगरातील रहिवासी सुनील अग्रवाल हे रविवार, 17 डिसेंबरला बाहेरगावला गेल्याची संधी चोरट्यांनी साधली. घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी प्रवेश करीत कपाटातील सोन्याची रूद्राक्षांची माळ, सोन्याची चैन, मंगळसूत्र, सोन्याच्या बांगड्या, कानातील टॉप्स, दोन अंगठ्या, सोन्याचे पेंडल, सोन्याचे ब्रेसलेट, सोन्याची नथ, चांदीचे साहित्य व 50 हजारांची रोकड मिळून पाच लाख 21 हजारांचा ऐवज लांबवला. बुधवार, 20 डिसेंबरला अग्रवाल घरी आल्यावर घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी येथील बाजारपेठ पोलिस ठाण्याला माहिती कळवल्यानंतर शुक्रवारी अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. डीवायएसपी कृष्णात पिंगळे, पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांनी भेट दिली. तपास सहायक पोलिस निरीक्षक हरीष भोये करीत आहेत.