प्रतिभा शिंदे यांचे भुसावळात कॉग्रेंस तर्फे धुमधडाक्यात स्वागत व सत्कार :

भुसावळ – लोक संघर्ष समितीच्या राष्ट्रीय अध्यक्ष प्रतिभा शिंदे यांच्या अखिल भारतीय राष्ट्रीय कॉग्रेंस मध्ये प्रवेश केल्या बद्दल भुसावळ स्टेशन वर भुसावळ कॉग्रेंस तर्फे धुमधडाक्यात सत्कार करण्यात आला .
लोक संघर्ष समितीच्या राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमती प्रतिभा शिंदे यांनी दीनांक 20/12/23रोजी दील्ली येथे माजी राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते कॉग्रेंस कमेटी मध्ये प्रवेश केला त्यांचे आज दिल्लीहून प्रथम भुसावळ येथे आगमन झाले असता भुसावल रेल्वे स्थानकावर महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमेटी अल्पसंख्यॉक विभाग तर्फे प्रदेश उपाध्यक्ष मो मुनव्वर खान यानी प्रतिभा ताईंचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला . या प्रसंगी लोक संघर्षचे चन्द्रकांत चौधरी, सलीम सेठ चुडीवाले, साबीर मेम्बर,जुबेर खान, कॉग्रेंस शहर अल्पसंख्यॉकचे अध्यक्ष सलीम गवली, सेवादल शहर अध्यक्ष संजय खडसे, जिला सचिव हमीद शेख,जानी ,वेलदाड तालुका भुसावल चे कार्य करते व वेलदाडचे उप सरपंच हेमंत पाटील,आकाश कुरकुरे,रूपेश पाटील यांचेसह कॉग्रेंसच्या व ताईच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिंदे यांचे जोरदार स्वागत करून सत्कार केला .