भुसावळ – रेल्वे महाव्यवस्थापक राम करण यादव, यांनी 22 डिसेंबर 2023 रोजी भुसावळ विभागातील भुसावळ-खंडवा विभागावर वार्षिक सुरक्षा तपासणी केली. या पाहणीवेळी सर्व विभागाचे प्रमुख, भुसावळ विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पांडे व इतर अधिकारी उपस्थित होते.
सावदा स्टेशन, सावदा-निभोरा येथील गेट क्र. १६४ वरील आर यु बी, सावदा येथील अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा महाव्यवस्थापकांनी आढावा घेतला. रावेर-वाघोडा दरम्यानच्या पुलाची पाहणी केली. बुरहानपुर स्टेशन इमारत, स्टेशन परिसर, आरपीएफ पोलिस स्टेशन, पॅनल रूम, बुरहानपूर स्टेशनची रेल्वे कॉलनी यांची पाहणी केली. बुरहानपूर येथील सुरक्षा आणि राजभाषा प्रदर्शनाची त्यांनी पाहणी केली.
सरव्यवस्थापकांनी बुरहानपूर-असीरगढमधील गँगमनची टीम चे तपासणी केली. यानंतर नेपानगर-डोगरगाव दरम्यान हायस्पीड रन चाचणी घेण्यात आली. यानंतर महाव्यवस्थापकांनी खंडवा येथील प्लॅटफॉर्मवरील स्टेशन परिसर, रनिंग रूम, ओएचई डेपो, क्रू लॉबी, एस्केलेटरची पाहणी केली.
महाव्यवस्थापकांनी भुसावळ स्थानकावरील स्थानक परिसर, ड्राइवर/गार्ड लॉबी आणि स्थानकाची पाहणी केली.
महाव्यवस्थापक यादव यांनी खासदार श्रीमती रक्षा खडसे व आमदार संजय सावकारे यांची भुसावळ येथे भेट घेतली व आमदार शिरीष चौधरी यांची सावदा स्टेशन येथे भेट घेतली. आणि खांडवा रेल्वे स्थानकावर माननीय आमदार श्रीमती कांचन तन्वे यांची भेट घेऊन रेल्वेच्या विविध समस्यांवर चर्चा केली.
भुसावळमध्ये यादव यांनी मान्यताप्राप्त संघटना आणि व्यापारी संघटनांशी संवाद साधला आणि पत्रकारांच्या प्रतिनिधींना संबोधित केले.







