१८ किमी धावून व विविध उपक्रमांनी धावपटूंनी केला वर्धापनदिन साजरा : भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचा स्तुत्य उपक्रम”


भुसावळ – डिसेंबर २०१७ मध्ये भुसावळ शहरात सुदृढ आरोग्यासाठी धावण्यासाठी जमलेल्या काही मोजक्या नागरिकांची संख्या हळूहळू वाढू लागली व गेल्या सहा वर्षात सातत्यामुळे आज घडीला १५० हून अधिक धावपटू असलेल्या भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचा वर्धापनदिन सर्व धावपटूंनी मोठ्या उत्साहात साजरा केला. पहाटे ४.३० वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदानावर डॉ. नीलिमा नेहेते , डॉ चारुलता पाटील ,डॉ वर्षा वाडिले, डॉ स्वाती फालक, एकता भगत ,कीर्ती मोटाळकर, संगीता चौधरी, दीपा स्वामी ,सरला पाटील, माधुरी चौधरी या महिला धावपटूसोबत सुरेश सहानी, विलास पाटील, जितेंद्र चौधरी, ताराचंद खरारे, प्रशांत वंजारी ,गनसिंग पाटील ,मंगेश चंदन ,राजेंद्र ठाकूर, संतोष मोटवानी ,सारंग चौधरी ,महेंद्र पाटील व प्रवीण पाटील या धावपटूंनी सुरुवातीस वॉर्मअप करून धावायला सुरुवात केली. या रनचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व पुरुष व महिला धावपटूनी एकत्र सारख्या वेगात धावायचे नियोजन केले होते व ठरल्याप्रमाणे सर्वांनी सोबत १८ किमी अंतर सहजरीत्या पूर्ण केले. मैदानापासून आरपीडी रस्त्यावर धावायला सुरुवात केल्यानंतर भारत माता की जय,वंदे मातरम, भुसाव रनर्स की जय,जय बिसारा आदि घोषणा देत धावपटू मोठ्या उत्साहात हळूहळू अंतर कापत होते.दीपनगरच्या पुढे जाऊन तिथून पुन्हा वळसा घेऊन धावपटू पुन्हा त्याच मार्गाने क्रीडांगणावर परतले. त्यावेळी सहाव्या वर्धापनदिनानिमित्त सहा किमी अंतर धावून आलेल्या व मैदानावर आधी परतलेल्या सर्व नवोदित महिला व पुरुष धावपटूंनी १८ किमी धावलेल्या धावपटूंचे टाळ्या वाजवून मोठ्या उत्साहात स्वागत केले. त्यानंतर स्ट्रेचिंग एक्सरसाइज घेण्यात आली. या संपूर्ण रनसाठी संघटनेचे प्रमुख प्रा. प्रवीण फालक यांनी धावपटूंसाठी पेयजल व खाद्यपदार्थांची व्यवस्था करण्यासोबतच ठिकठिकाणी त्यांना मार्गदर्शन देखील केले.
त्यानंतर संध्याकाळी चार ते सहा या वेळेत विविध कार्यक्रमांद्वारे सर्व धावपटू व सायकलपटूंनी सहपरिवार वर्धापन दिन साजरा केला. याप्रसंगी सुनिता सिंग,सविता घाटे, सीमा बापारी, सीमा वायकर, प्रीती पांडा व पारुल वर्मा यांनी नृत्याविष्कार सादर केला. त्याचबरोबर डॉ नीलिमा नेहेते व रमेशसिंग पाटील यांनी गीतगायन केले. यावेळी दीपा स्वामी, प्रदीप माळी ,अॅड मोहन देशपांडे, सारंग चौधरी, रीना परदेशी या धावपटूंनी आपले मनोगत व्यक्त केले. विश्वस्तांच्या वतीने ब्रिजेश लाहोटी यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर प्रवीण फालक, डॉ. नीलिमा नेहेते, प्रवीण पाटील, ब्रिजेश लाहोटी ,प्रवीण वारके ,रणजीत खरारे, डॉ चारुलता पाटील, पुनम भंगळे, डॉ तुषार पाटील या विश्वस्तांच्या वतीने उपस्थित धावपटू व सायकलपटूंना अभिवादन करण्यात आले व धन्यवाद देण्यात आले.
यावेळी शरीर सुदृढता संदेश देण्यासाठी केक न कापता पपई कापण्यात आली. कार्यक्रमासाठी भेल इंडियाचे व्यवस्थापक दिनेश जावडे व रेल्वेचे अधिकारी विवियन रॉड्रिक्स यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी सर्व धावपटूंसाठी विविध खेळांचे देखील आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रवीण पाटील यांनी केले. अध्यक्ष स्थानी प्रा प्रवीण फालक होते तर आभार डॉ नीलिमा नेहेते नेते यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उमेश घुले, छोटू गवळी यांचे सहकार्य लाभले