भुसावळ – आपण ज्या समाजासाठी काम करतो त्या समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम पत्रकारांनी करावे असे प्रतिपादन व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश उज्जैनवाल यांनी भुसावळ येथे आयोजित व्हाईस ऑफ मीडियाच्या जिल्हास्तरीय बैठकीत केले .यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष मिलिंद टोके जेष्ठ पत्रकार श्रीकांत जोशी, संजयसिंग चव्हाण, व्हॉइस ऑफ मीडियाच्या तालुकाध्यक्षा उज्वला बागुल शहर पत्रकार संस्थेचे अध्यक्ष प्रेम परदेशी ,व्हॉइस ऑफ मीडियाचे सचिव सुनील आराक, नाना पाटील सर आदी उपस्थित होते. पुढे बोलताना उज्जेनवाल म्हणाले की ज्यावेळी पत्रकारां वर वाईट परिस्थिती येते त्यावेळी त्यांना कोणीही मदत करत नाही हे पत्रकाराचं दुर्दैव म्हणावे लागेल पत्रकाराने कोणासाठी काम करावे जर आमच्या वाईट काळामध्ये ज्या लोकांची आम्ही वर्षांनुवर्षे सेवा केली ते लोक जर आमचे अश्रू पुसायला हि येत नसतील तर आम्ही कशासाठी पत्रकारिता करावी. या गोष्टी लक्षात घेऊन आपण एक संघ राहिले पाहिजे पत्रकारिता ही एक प्रतिभा आहे. सर्वच पत्रकार चांगले आहेत आपण समाजासाठी काम करतो त्या समाजाला न्याय देण्याचा आपण प्रयत्न करावा , तसेच नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशन दरम्यान १३ डिसेंबर पासून व्हॉईस ऑफ इंडिया मोठ्या प्रमाणात पत्रकारांच्या मागणी संदर्भात न्याय व हक्कासाठी उपोषण करणार असल्याचेही उज्जैनवाल सर यांनी यावेळी सांगितले .
यावेळी नुकतेच व्हॉईस ऑफ मीडियाच्या जळगाव जिल्हाध्यक्ष पदी नियुक्त झालेले मिलिंद टोके यांना व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश उज्जेनवाल यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले . तसेच पत्रकारांच्या पाल्यांना व्हॉईस ऑफ मीडियाच्यावतीने शैक्षणिक किट देण्यात आली . प्रसंगी मिलिंद टोके यांनी जिल्ह्यांतून संघटन वाढवून सर्व पत्रकारांना न्याय देण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून कटिबद्ध असल्याचे सांगितले . बारामती येथे ग. दि. माडगूळकर सभागृहात 18 ते 20 नोव्हेंबर दरम्यान व्हाईस ऑफ मीडियाची राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये पत्रकारांच्या हिताचे 14 ठराव पारित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने पत्रकारांचे संघटन वाढविण्याच्या दृष्टीने भुसावळ येथील सार्वजनिक वाचनालयात 9 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता व्हाईस ऑफ मीडियाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश उज्जैनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नवनिर्वाचित व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष मिलिंद टोके यांचा सत्कार करण्यात आला.
या बैठकीसाठी , शाकीर मलिक, राजेंद्र भागवत भारंबे, समीर गंभीर तडवी, अनोमदर्शी सखाराम तायडे, श्याम वसंत पाटील, वासुदेव सरोदे, प्रवीण पाटील, योगेश सोनवणे ,पंकज युवराज पाटील, अनिल भागवत मानकरे, युसुफ शब्बीर खाटीक, सुरेश देवराम महाले, संदीप मधुकर वैष्णव, रवींद्र नारायण मराठे, अमोल भास्कर अमोदकर, मनोहर रंभाजी लोणे, विजय गणपत वाघ, ,शेख कलीम शेख हुसेन, राहुल वानखेडे, कालूशाह मासूम शहा ,संजय रामकृष्ण काशीव , विनोद बापूराव गोरधे, निरंजना सुरेश तायडे, जितेंद्र अशोक कुलकर्णी, हबीब चव्हाण ,गोपाल रमेश म्यांद्रे आदी रावेर, यावल,सावदा फैजपूर, बोदवड, येथील पञकार उपस्थित होते.
दरम्यान सर्व तालुका प्रतिनिधी यांनी संघटन वाढीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली . बारामती अधिवेशनात उपस्थित असलेल्या पत्रकारांनी बारामती येथील आलेले अनुभव कथन केले . व्हॉईस ऑफ मीडिया ही देशपातळीवरच नव्हे तर अंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करणारी एकमेव नंबर वन संघटना असल्याचे विषद करून संस्थापक अध्यक्ष काळे यांना धन्यवाद दिले .सुत्रसंचालन व आभार श्रीकांत जोशी सर यांनी मानले




