भुसावळ – जवाहर नवोदय विद्यालयात रीजनल कल्चरल मीट अंतर्गत-आर्ट एक्जीबिशन व कला प्रस्तुतीकरण (सांस्कृतिक एकात्मता संमेलन व कला प्रदर्शनी) -सोहळ्यातील दुसऱ्या दिवसाच्या दिनांक ३ रोजी सकाळी अतिथी स्वागत यामध्ये सहाय्यक आयुक्त नवोदय विद्यालय समिती मेरी मनी मॅडम, प्राचार्य जवाहर नवोदय विद्यालय नागपूर कुरेशी मॅडम. प्राचार्य जवाहर नवोदय विद्यालय अकोला श्री चंदनशिव व श्री आर आर कासार नवोदय विद्यालय बुलढाणा , जवाहर नवोदय विद्यालय जळगाव श्री. विजय अंभोरे इत्यादी उपस्थित होते यांच्या स्वागतानंतर सकाळी नऊ वाजता साहित्यिक क्रियाकलापांना सुरुवात झाली त्यामध्ये सर्वात प्रथम निबंध लेखन क्रियाकलापा मध्ये रायगड ,दमन, हिंगोली अहमदाबाद, गोंदिया येथील जवाहर नवोदय विद्यालयातील पंधरा विद्यार्थी सहभागी झाले तर नंतर वक्तृत्व स्पर्धेला सुरुवात झाली जवाहर नवोदय विद्यालय हिंगोली, दमण ,गोंदिया, रायगड, अहमदाबाद येथील आठ विद्यार्थी सहभागी झाले .याच श्रुंखलेत कविता गायनामध्ये जवाहर नवोदय विद्यालय दमन ,हिंगोली ,गोंदिया, अहमदाबाद येथील अकरा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला सदर विद्यार्थ्यांनी मिशन लाईफ एन्व्हायरमेंट, वसुधैव कुटुंबकम इत्यादी विषयावर काव्यगायन केले . या उपरात क्रिएटिव्ह रायटिंग यामध्ये 16 विद्यार्थी सहभागी झाले जवाहर नवोदय विद्यालय दमन हिंगोली या दोन शाळा सहभागी होत्या याच क्रमांक सकाळच्या सत्रातील शेवट सेमिनार या क्रिया कलापाणी झाला यामध्ये जवाहर नवोदय विद्यालय अहमदाबाद,गोंदिया, रायगड येथील एकूण 22 विद्यार्थी सहभागी झाले होते या संपूर्ण क्रियाकलापांचे परीक्षण तज्ञांनी केले भुसावळ येथील के.नारखेडे विद्यालयातील एस. टी. चौधरी, एस.टी. वासकर, एस. पी. पाठक हे तज्ञ परीक्षक म्हणून लाभले दुपारच्या दुसऱ्या सत्रात मुख्य अतिथी जिल्हाधिकारी जळगाव आयुष प्रसाद यांची उपस्थिती लाभली. जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत श्रीमती मेरी मनी सहाय्यक आयुक्त नवोदय विद्यालय समिती ,पुणे संभाग यांनी केले,ड्रामा रायटर थिएटर भुसावळ हर्षल पाटील आमदार , संजय सावकारे इत्यादी मान्यवर अतिथी गणांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमातील या द्वितीय सत्रात उर्वरित क्रिया कलाप ज्यामध्ये समूहगीत, नाटक, समूह नृत्य इत्यादींचा समावेश होता. सदर सदर क्रिया कलापांचे परीक्षण श्रीकांत जोशी , आनंद सपकाळे ,धर्मराज देवकर या तज्ञ परीक्षकांनी केले . कार्यक्रमाच्या शेवटी बक्षीस समारंभाचा कार्यक्रम पार पडला यामध्ये मान्यवरांच्या हस्ते प्रथम ,द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त शाळेला विद्यार्थ्यांना तसेच सहभागी शिक्षकांनाही सर्टिफिकेट व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर संजय सराठे ,बलराम दिवेदी ,अजय धारणे यांनी केले. शेवटी आभार प्रदर्शन प्राचार्य जवाहर नवोदय विद्यालय नागपूर श्रीमती कुरेशी यांनी केले



