वरणगाव – माळी समाजाचे ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांच्याबद्दल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जळगाव दौऱ्यावर असताना जळगाव, भुसावळ, वरणगाव या ठिकाणी आपल्या भाषणातून माळी समाजाचे नेते छगन भुजबळ यांच्याबद्दल ‘एकेरी शब्दातून त्याला मी पाहून घेईल’ अशा प्रकारे अनेक बेताल वक्तव्य करून माळी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याने दि.७ बुधवारी माळी समाज आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांचा निषेध करून पोलीस स्टेशनचे एपीआय भरत चौधरी यांना निषेधाचे निवेदन दिले.

वरणगाव पोलीस स्टेशनचे एपीआय भरत चौधरी यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, ओबीसी नेते छगनराव भुजबळ गेल्या 30 ते 40 वर्षापासून ओबीसी समाज बांधवांसाठी लढा देत आहे. परंतु मागील काही दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करून उदयास आलेले मनोज रंगे पाटील यांनी सुरुवातीला मराठा समाजाला वेगळ्या आरक्षण मिळावे अशी मागणी केली होती. नंतर आपली भूमिका बदलवून ओबीसी समाजातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी विविध भागात हे आपले दौरे करीत आहे. याच दौऱ्या दरम्यान जळगाव जिल्ह्यात दिनांक 4 डिसेंबर रोजी आले असता जळगाव, भुसावळ, वरणगाव ते मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या भाषणातून ओबीसींचे नेते मंत्री छगनराव भुजबळ यांच्या बद्दल एकेरी शब्दात बोलून ‘त्याला मी पाहून घेईल त्याला किंमत देऊ नका’ अशा प्रकारचे अनेक बेताल वक्तव्य करून समस्त माळी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यामुळे वरणगाव येथील माळी समाज बांधव अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आक्रमक होऊन यांच्यावतीने मनोज जरांगे पाटील यांचा निषेध करीत पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले. यावेळी छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ समाज बांधवांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती.
याप्रसंगी माळी समाजाचे अध्यक्ष संजय माळी, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष माळी, पंच गणेश तुकडू माळी, निवृत्ती माळी, सुभाष माळी, सुनील माळी, सुरेंद्र थोरात, जे.बी. माळी, प्रल्हाद माळी, अरुण माळी, चेतन माळी, गंभीर माळी, पुरुषोत्तम माळी, भगवान माळी, कृष्णा माळी, विकास माळी, रितेश माळी, किरण माळी, निलेश माळी, दीपक माळी, संकेत माळी, ज्ञानेश्वर माळी, योगेश थोरात, शुभम माळी, विशाल माळी, भूषण माळी, वैभव माळी, भूषण माळी, पवन माळी, अनिकेत माळी यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
- वारंवार भुजबळ साहेबांना टार्गेट करू नये- संतोष माळी
ओबीसी नेते छगनराव भुजबळ यांच्यासह समस्त माळी समाजाची एकच भूमिका आहे. मराठा समाजाला आरक्षण जरुर मिळावे त्यांना आमचा विरोध नाही आहे. परंतु आमच्या ओबीसी हीश्यामधून न मिळता वेगळे आरक्षण त्यांना द्यावे, अशी छगन भुजबळ यांची भूमिका आहे. वारंवार उठ सूट फक्त भुजबळ यांना मनोज जरांगे पाटील यांनी टार्गेट करू नये, अन्यथा माळी समाजही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.
- संतोष माळी, जिल्हा कार्याध्यक्ष अ.भा.महात्मा फुले समता परिषद, जळगाव


