भुसावळ – येथील जवाहर नवोदय विद्यालयात रीजनल कल्चरल मीट अंतर्गत-आर्ट एक्झिब्युशन व प्रस्तुतीकरण कला (सांस्कृतिक एकात्मता संमेलन व कला प्रदर्शनी) उद्घाटन दि २ रोजी झाले.
कला प्रदर्शनीचे उद्घाटन मेरी मनी सहाय्यक आयुक्त नवोदय विद्यालय समिती पुणे संभाग यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून नुपूर कथ्थक अकेडमीचे संचालक रंगकर्मी रमाकांत भालेराव उपस्थित होते. कला प्रदर्शनीचे मूल्यांकन करण्यासाठी कलातज्ञ म्हणून अतुल मालखेडे,पंकज साखरे, अरविंद बडगुजर उपस्थित होते. .यानंतर प्रादेशिक सांस्कृतिक एकात्मता प्रस्तुतीकरण स्पर्धेच्या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्य अतिथी मेरी मनी सहाय्यक आयुक्त नवोदय विद्यालय समिती पुणे संभाग यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने व सरस्वती पूजनाने झाली . याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून नुपूर कथ्थक अकेडमीचे संचालक रंगकर्मी रमाकांत भालेराव, विद्यालयाचे प्राचार्य विजय अंभोरे यांनी मार्गदर्शन केले. जवाहर नवोदय विद्यालय जळगाव तर्फे स्वागत गीत तसेच कोळी नृत्य व तारपा नृत्य प्रस्तुत करण्यात आले. यानंतर प्रादेशिक सांस्कृतिक एकात्मता प्रस्तुती करण्याच्या स्पर्धेला सुरुवात झाली.प्रसंगी वसुधैव कुटुंबकम ‘ थिमवर विद्यार्थ्यांनी कलागुण सादर केले
कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र,गोवा , गुजरात,दीव दमन व नगर हवेली येथील सर्व विद्यालयातून प्रवेशिका आल्या असून एकूण तीनशे स्पर्धक आलेले आहेत. यामध्ये पहिल्या दिवशी समूह नृत्य -जवाहर नवोदय विद्यालय म्हैसाणा ,जवाहर नवोदय विद्यालय सुरेंद्रनगर, जवाहर नवोदय विद्यालय औरंगाबाद यांनी प्रस्तुत केले तर जवाहर नवोदय विद्यालय -पोरबंदर यांनी समूहगीत प्रस्तुत केले, तदनंतर जवाहर नवोदय विद्यालय कोल्हापूर यांनी वसुधैव कुटुंबकम या विषयावर आधारित नाटिका प्रस्तुत केली. तर विद्यार्थ्यानी अतिशय सुंदर नृत्य व कलाकृती सादर केल्या .
या पहिल्या दिवसाच्या प्रस्तुतीकरणाचे मूल्यांकन करण्यासाठी जेष्ठ पत्रकार श्रीकांत जोशी, आनंद सपकाळे सर , धर्मराज देवकर यांची उपस्थिती लाभली. तसेच याप्रसंगी प्राचार्य जरीना कुरेशी जवाहर नवोदय विद्यालय नागपूर,आर.आर.कासार जवाहर नवोदय विद्यालय बुलढाणा,चंदनशिव नवोदय विद्यालयअकोला व विद्यालयाचे प्राचार्य विजय अंभोरे उपस्थित होते.तसेच या प्रसंगी स्पर्धेकरिता आलेले वेगवेगळ्या नवोदय विद्यालयातील स्पर्धक विद्यार्थी, सोबत आलेले एस्कॉर्ट टीचर, पालक वर्ग, विद्यालय परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय सराटे, दिवेदी,संध्या राजे व कुमारी वैष्णवी सोनवणे यांनी केले तर प्रास्ताविक प्राचार्य विजय अंभोरे यांनी केले व आभार प्रदर्शन सतीश झा यांनी केले.



