भुसावळ : पोलिस कॉन्स्टेबल वसीम रहेमान मलिक यांना अनुश्री महिला बहुउद्देशीय संस्थेतर्फे भारत भूषण राष्ट्रीय पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आले. विविध क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणार्या सन्माननीय मान्यवरांना भारत भूषण राष्ट्रीय पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.

सामाजिक कार्याची दखल
महाराष्ट्र पोलीस प्रशासनात सेवा बजावत असताना कॉन्स्टेबल वसीम रहेमान मलिक यांनी कोरोना काळात पोलिस विभागातील पोलिसांसह त्यांच्या कुटुंबियांना कोरोना झाल्यानंतर तत्काळ व महत्त्वाची मदत केली तसेच त्यामुळे तत्काळ पोलिसांवर उपचार करणे शक्य झाले. या कार्याची दखल घेत उद्योजक मनोज बियाणी, राजू सूर्यवंशी संस्थेच्या अध्यक्ष जयश्री इंगळे , यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना गौरवण्यात आले. मलिक यांनी आपली कन्या मारीया हिचा वाढदिवस साजरा न करता या दिवशी गरजू, गोरगरीबांना अन्न, कपडे व इतर साहित्याचे वाटप केले आहे.


