महिलांसाठी मोफत स्कुटी प्रशिक्षण : अभिजीत पवार आणि मित्र परिवार यांचा स्तुत्य उपक्रम :

ठाणे / खारीगाव – कालानुरूप होणारा अमुलाग्र बदल पाहता आजची स्त्री ही केवळ चूल व मुल यामध्ये न अडकता स्वतःचे अस्तित्व सिद्ध करत आहे . ओघाने तिला कामासाठी घराबाहेर पडावे लागते ही बाब लक्षात घेवून महिलांच्या सहकार्याकरिता अभिजीत पवार आणि मित्र परिवार यांच्या वतीने खारीगाव/ पारसिक नगर प्रभागातील महिलांसाठी मोफत स्कुटी प्रशिक्षण शिबिर दिनांक २७ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले या स्कुटी प्रशिक्षणाचे उद्घाटन ऋता जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी अजिता कुमठेकर , यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते . प्रशिक्षणास
पाहिल्या दिवशी महिलांनी उत्स्फूर्तपणे मोठ्या प्रमाणात
प्रतिसाद दिला . उद्घाटना नंतर दुसऱ्या दिवशीपासून प्रशिक्षण सुरू असून अनेक महिला हिरीरीने प्रशिक्षण घेत आहे , तसेच ज्यांनी सायकल सुद्धा चालवली नसेल अश्या महिलांना प्रारंभी सायकल चालवण्याचे प्रशिक्षण सुद्धा देण्यात येत आहे .
यशस्वीतेसाठी अभिजीत पवार आणि मित्र परिवार परिश्रम घेत आहे . प्रशिक्षणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड व ऋता जितेंद्र आव्हाड यांचे विशेष सहकार्य लाभले .