छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपूर आणि सोलापूर एकमार्गी विशेष गाड्या २डिसेंबर पासून सुरू :

मुंबई – प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते नागपूर आणि सोलापूर या २ एकमार्गी विशेष गाड्या चालवणार आहे.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-नागपूर सुपरफास्ट वन वे स्पेशल ०२१०३ सुपरफास्ट एकेरी विशेष गाडी शनिवार दि. ०२.१२.२०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ००.२० वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १५.३२ वाजता पोहोचेल.

थांबे: दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.

संरचना: १७ डब्बे – एक द्वितीय वातानुकूलित, तीन तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान, २ गार्ड ब्रेक व्हॅनसह ५ सामान्य द्वितीय श्रेणी.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-सोलापूर सुपरफास्ट वन वे स्पेशल

०२१०५ एकेरी विशेष गाडी रविवार दि. ०३.१२.२०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ००.३० वाजता सुटेल आणि सोलापूर येथे त्याच दिवशी ०८.१० वाजता पोहोचेल.

थांबे: दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड आणि कुर्डूवाडी.
संरचना: १७ डब्बे – एक द्वितीय वातानुकूलित, तीन तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान, २ गार्ड ब्रेक व्हॅनसह ५ सामान्य द्वितीय श्रेणी.

आरक्षण: ०२१०३ आणि ०२१०५ वन-वे स्पेशल ट्रेनसाठी विशेष शुल्कासह बुकिंग दि. ३०.११.२०२३ रोजी सर्व पीआरएस (PRS) स्थानांवर आणि www.irctc.co.in संकेतस्थळावर उघडेल.
प्रवाशांनी विशेष सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.