कला व विज्ञान महाविद्यालय भालोद येथे संविधान दिन उत्साहात साजरा :



भालोद – सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय भालोद तालुका यावल येथील राज्यशास्त्र विभागाच्या वतीने संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी भारतीय राज्यघटनेची माहिती विद्यार्थ्यांना अवगत करून दिली. भारतीय राज्यघटना समितीच्या सदस्यांची स्वाक्षरी असलेली ही प्रत सर्व मुलांना विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली. भारतीय राज्यघटना समितीचा इतिहास विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ.सुनील नेवे यांनी याप्रसंगी आपल्या मनोगतातून भारतीय राज्यघटनेचा इतिहास ,भारतीय राज्यघटना कशी निर्माण झाली, राज्यघटना तयार करण्यास किती दिवस लागले, घटना समितीमध्ये कोण कोण सदस्य होते ,याबद्दल सविस्तर विवेचन केले .तसेच भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट असलेल्या मूलभूत हक्कांविषयी, मूलभूत कर्तव्यांविषयी विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली. भारतीय राज्यघटनेतील विविध कलमे ,प्रकरणे ,परिशिष्ट याविषयी संदर्भसह स्पष्टीकरण दिले .भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना का म्हटले जाते, याविषयीचे स्पष्टीकरण प्रा. सुनील नेवे यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना दिले .तसेच भारतीय नागरिक म्हणून आपण सर्वांनी भारतीय राज्यघटनेचे पालन करावे असे आवाहन याप्रसंगी विद्यार्थ्यांना केले. भारतीय राज्यघटनेची जी उद्देश पत्रिका आहे त्या उद्देश पत्रिकेचे सामूहिक वाचन याप्रसंगी केले .राज्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या संविधान दिनाच्या कार्यक्रमाला प्रा.डॉ.डी .एल.सूर्यवंशी (धनाजी नाना महाविद्यालय फैजपुर) यांची विशेष उपस्थिती होती.तसेच प्रा.डॉ.दिनेश पाटील,प्रा.डॉ.पद्माकर सावळे,प्रा.डॉ.अजय कोल्हे,प्रा.डॉ.दिनेश महाजन ,प्रा.डॉ.सौ.मीनाक्षी वाघुळदे ,प्रा.दिलीप चौधरी,प्रा.योगिता चौधरी,.तुळशीराम पाटील,.चंद्रकांत लोखंडे, . दिलीप इंगळे, रुपम बेंडाळे ,कल्याण चौधरी,हे उपस्थित होते.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के.जी .कोल्हे ,उप प्राचार्य प्रा.मुकेश चौधरी,प्रा.डॉ. जतिन मेढे यांच्या मार्गदर्शनाखाली व असंख्य विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.