वरणगाव – जिल्ह्यात तीन कॅबीनेट मंत्री असताना कोणतेही ठोस विकासाचे काम नाही शेतकऱ्याच्या कापसाला भाव नाही शेतमजुराच्या हाताला काम नाही नोकरदार त्रस्त असल्याने सरकार विरोधात राष्ट्रवादीच्या आक्रोश मोर्चात सहभागी होण्याच्या आवाहन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैया पाटील यांनी केले आहे

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात घेण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आढावा बैठकीत प्रमूख उपस्थीत असलेले पाटील यांनी उपस्थीतांना मार्गदर्शन करताना राज्य सरकार व केंद्र सरकार शेतकऱ्याच्या पाठीत खंजीर खुपसत आहे शेतकऱ्याच्या शेती मालाला हमी भाव देत नाही , कापसाला भाव मिळत नाही , पिक विमा भरताना मुदत दिली जाते परंतु पैसे देताना जाचक नियम व अटी घातल्या जातात , केळी पिका बाबतही सरकार सवेदनशील नाही बेरोजगार तरुणांनाच्या हाताला काम देऊ शकत नसल्याने सरकार विरोधात शेतकाऱ्याच्या व जनतेच्या मनात चिड निर्माण झाल्याने याचा जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दि ३० रोजी जळगाव येथे आक्रोश मोर्चाचे आयोजन केलेले असुन परिसरातील शेतकरी , शेतमजुर , नोकरदार , बेरोजगार तरुणांना या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले
यावेळी नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या लोकनियुक्त सरपंच विल्हाळे येथील सरपंच व सदस्य , फुलगाव येथील सरपंच व सदस्य यांचा सत्कार करण्यात आला
या बैठकी प्रसंगी मंचावर रावेर लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक अतुल पाटील , जिल्हा संपर्क प्रमुख मनोहर पाटील , जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी , सुधाकर जावळे , श्याम फुलगावकर , शारदा कोल्हे , अरुणाबाई इंगळे , संगीता भामरे आदी मान्यवर उपस्थित होते
बैठकीच्या सुरुवातीस मुंबई येथे २६ / ११ च्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस दलातील अधिकारी व जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येऊन बैठकीस सुरुवात झाली
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाय , आर पाटील यांनी केले तर दिपक मराठे यांनी आभार व्यक्त केले
बैठकीस मोठया संख्येने पदाधीकारी व कार्यकर्ते उपस्थित होते


