भुसावळ – गर्दी बघता मध्य रेल्वे ने
बडनेरा – नाशिक – बडनेरा गाडीची मुदतीत वाढ करण्यात आली असून आधी दिनांक 19:11:23 पर्यंत होती पण गर्दी बघता ही गाडी ची मुदत ही दिनांक 30:11:23 पर्यंत वाढविण्यात आली आहे

गाडी क्रमांक 01211 विशेष मेमू बडनेरा येथून दि. 19.11.23 ते 30.11.23 पर्यंत दररोज 11:05 वाजता सुटेल आणि नाशिक येथे त्याच दिवशी 19:40 वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक 01212 विशेष मेमू नाशिक येथून दि. 19.11.23 ते 30.11.23 पर्यंत वाढविण्यात आली आहे दररोज 21:15 वाजता सुटेल आणि बडनेरा येथे दुसऱ्या दिवशी 04:35 वाजता पोहोचेल.
थांबे: बडनेरा, मुर्तजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, लासलगाव, निफाड आणि नाशिक.
प्रवाशांना सुचना आहे की तिकिट काढण्याच्या लाईन पासून बचाव करावयाचा असल्यास यू टी एस ऍप चा उपयोग करा
या विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्यावी किंवा NTES ॲप डाउनलोड करावे.


