अंतर्नाद प्रतिष्ठान तर्फे सातपुड्यात ३७५ जणांना फराळासह नवीन कपडे वाटप : चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य :

भुसावळ – प्रतिनिधी

भुसावळच्या अंतर्नाद प्रतिष्ठान तर्फे यावल तालुक्यातील नागादेवी, आदिवासी वस्ती येथे सामूहिक दिवाळी साजरी करण्यात आली. त्यात १२७ कुटुंबातील मुला-मुलींना नवीन कपडे, महिलांना साड्या, पुरुषांना कपडे,ब्लॅकेट, आंघोळीचे रुमाल, स्वेटर, फराळ, शैक्षणिक साहित्य, पणत्या, बिस्किट, चॉकलेट आणि यांचे वाटप करण्यात आले.

दीपाेत्सवाच्या निमित्ताने अंतर्नाद तर्फे ‘एक वाटी फराळ व नवीन कपडे द्या आणि वंचितांची दिवाळी गाेड करू या’ असे आवाहन करण्यात आले हाेते. त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला.या उपक्रमांतर्गत गाेळा करण्यात आलेले साहित्य व फराळ यावल तालुक्यातील नागादेवी येथील आदिवासी पाड्यात वाटप करण्यात आले. यंदा उपक्रमाचे आठवे वर्ष होते.

उपक्रमासाठी या दात्यांचे लाभले सहकार्य *
अमोल हरिभाऊ जावळे, राजेश्वरी संधानशिवे, जयेश राणे, मधुकर चौधरी, रघूनाथआप्पा सोनवणे, डॉ.भाग्यश्री भंगाळे, राजू बोंडे, सुनील पटेल, डॉ.मनोज चौधरी, सिद्धेश्वर वाघुळदे, सारिका भालेराव, मनीषा घुले, विजय नेहते, गिरीश भारंबे, विनोद अग्रवाल, विकास वराडे, जय पाठक, जयश्री शेलार, गिरीराज फेगडे, राकेश रानडे, पांडुरंग महाजन, भूषण कोटेचा, चारिका चौधरी, मॉरिस व्हिक्टर, अनिकेत पाटील, प्रवीण बऱ्हाटे, किशोर सुतार, परीक्षित पवार, संजीव राजपूत, प्रकाश सूर्यवंशी, प्रमोद सावकारे, क्रांती सुरवाडे, नितीन लोखंडे, कुंदन सोनवणे, सुनील सोनवणे, राजू गायकवाड, मधुकर चौधरी, श्रीकांत मोटे, किरण जाधव, वंसत सोनवणे, ज्योती जैन, सचिन पाचपांडे, प्रकाश बेलसरे, किरण पाटील, भरत बऱ्हाटे, ज्ञानेश्वर मोरे, तात्या करांडे, मनमोहन करसाळे, मामा पाचपांडे, जय किशन टेकवानी, दीपाली पाटील, अमोल जावळे, विनोद चोरडिया, अलका सुरवाडे, दिलीप ललवाणी, कुंदन ढाके, एम.एच.तडवी, ममता चौधरी, जयश्री पाटील, अतुल चौधरी, सीमा नायदे, जयेश पाटील, अलका देवगिरीकर, मनीषा शिंदे, शरद हिवरे, राजेंद्र अत्रे, लीलाधर राणे, भारती अवचारे, प्रवीण सपकाळे, सचिन सोनवणे, रमेश पाटील, पंडित कोळी, सुनील पाटील, पी.एस.नेमाडे, तुषार चौधरी, सदाशिव निळे, दीपक इंगळे, रत्नमाला चौधरी, हिरामण इंगळे, रवींद्र वायकोळे, अंजली ठाकूर, विकास वारके, धीरज चौधरी, संदीप पाटील (शेमळदे ), राजेंद्र सुरवाडे, नरेंद्र बोरीकर, प्रवीण राणे या दात्यांनी उपक्रमाला सहकार्य केले.

प्रकल्प प्रमुख जीवन महाजन, समन्वयक प्रदीप सोनवणे, तर सह समन्वयक समाधान जाधव, योगेश इंगळे यांच्या सह डॉ.संजू भटकर, प्रसन्ना बाेराेले, शैलेंद्र महाजन, प्रा.श्याम दुसाने, अमितकुमार पाटील, ज्ञानेश्वर घुले, अमित चौधरी, कुंदन वायकोळे, राहुल भारंबे, राजू वारके, राजेंद्र जावळे, सचिन पाटील, तेजेंद्र महाजन, विक्रांत चौधरी,हितेंद्र नेमाडे, अतुल चौधरी, केतन महाजन, ललित महाजन, दिपक जावळे, विपीन वारके, उमेश फिरके, संदीप पाटील (सावखेडा), किशोर सोनवणे, विनोद सोनवणे, चंद्रकांत सूर्यवंशी,डॉ रवींद्र माळी, वर्षा अहिराराव, भारती ठाकरे,अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित हाेते.

*चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य *

अंतर्नादतर्फे गेल्या आठ वर्षांपासून हा उपक्रम राबवला जात आहे.पाड्यावरील चिमुकल्यांना नवे कपडे मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले हाेते. वाड्या-वस्त्यांवरील कुटुंबीयांसाेबत दिवाळी साजरी केल्याचा आनंद हा शब्दातीत आहे, अशी भावना अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी व्यक्त केली.

*उपक्रमाला मिळाले व्यापक स्वरुप *

‘वाटीभर फराळ आणि कपडे द्या’ या उपक्रमाला यंदा दात्यांकडून जाेरदार प्रतिसाद लाभला. त्यामुळे या उपक्रमास व्यापक स्वरुप मिळाले आहे. भविष्यात हा उपक्रम लाेकचळवळ व्हावा, या अनुषंगाने प्रयत्न करू, अशी ग्वाही प्रकल्प प्रमुख जीवन महाजन, समन्वयक प्रदीप सोनवणे, तर सह समन्वय समाधान जाधव, योगेश इंगळे यांनी दिली. शहरी लाेक पाड्यावर एकत्र येऊन दिवाळी साजरी करतात याचा आनंद असल्याची भावना येथील रहिवाशांनी व्यक्त केली.