भुसावळ – येथील महिला क्रीडा मंहळातर्फे खुल्या
बुध्दीबळ स्पर्धांचे शनिवारी (दि. १८) सकाळी ९ वाजता
आयोजन केले आहे. गेल्या चार वर्षापासून महिला क्रीडा
मंडळातर्फे बुध्दिबळ स्पर्धांचे आयोजन केले जाते. दरवर्षी होणाऱ्या या खुल्या
बुध्दिबळ स्पर्धेत जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यभरातील
स्पर्धक सहभागी होत असतात.

ज्यांना बुध्दीबळ स्पर्धेत आवड असेल ते या स्पर्धेत सहभागी होऊ
शकतात. त्यासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन केले
आहे. स्पर्धा सकाळी ९ वाजता सुरू होणार आहे. स्पर्धकांनी
संतोषी माता हॉल येथे सकाळी ८.३० वाजता उपस्थित राहावे,
असे आवाहन मंडळाच्या अध्यक्षा आरती चौधरी व
पदाधिकाऱ्यांनी केले आहे.


