भुसावळ :-भारतीय टेनिस बॉल क्रिकेट फेडरेशनच्या मान्यतेने महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे अधिपत्याखाली 28 सब-जूनियर राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा दोंडाईच्या येथे तीन ते सहा नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट संघाकडून भुसावळचा रणबीर यादव व साकेगाव चा मोहित भोई यांची राज्य संघामध्ये निवड करण्यात आली असून ,साकेगाव चा अबुजर पटेल याची संघाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. स्पर्धेत देशभरातील ३० राज्याच्या मुलांच्या , तर २० मुलींच्या संघाने सहभाग नोंदविला आहे.
निवड झालेल्या खेळांची जिल्हा क्रीडा महासंघाचे अध्यक्ष माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, डॉ प्रदीप तळवेलकर, रमण भोळे, प्रदीप साखरे, मेघश्याम शिंदे, राजू कुलकर्णी, बी. एन. पाटील, प्रा. आसिफ खान, प्रा. संजय चौधरी, जिल्हा सचिव वासेफ पटेल ,ललित लोखंडे यांनी अभिनंदन केले आहे.
पहिला फोटो मोहित भोई, दुसरा फोटो अबूजर पटेल, तिसरा फोटो रणबीर यादव..



