भुसावळ : दूरदर्शी राजनेता तथा लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४८ व्या जयंतीनिमित्त शहर व परीसरातील विविध संस्था, संघटना, पक्षांतर्फे विविध कार्यक्रमातून अभिवादन करण्यात आले. शहरात प्रथमच महिलांची विशाल एकता रॅली काढण्यात आली.
भाजपातर्फे लोहपुरूषांना अभिवादन
भुसावळ : जुना सातारा परीसरातील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस परीक्षीत बर्हाटे, माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयघोषाने संपूर्ण परीसर दणाणला. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक राजेंद्र नाटकर, पुरुषोत्तम नारखेडे, प्रमोद नेमाडे, राजेंद्र आवटे, प्रा.दिनेश राठी, अॅड.बोधराज चौधरी, किरण कोलते, मुकेश पाटील, गुणवंत बोरोले, प्रवीण इखणकर, शहर सरचिटणीस रमाशंकर दुबे, संदीप सुरवाडे, लक्ष्मण सोयंके, शंकर शेळके, शैलेजा पाटील, अनिता आंबेकर, वैशाली सैतवाल, गिरीष पाटील, किरण सरोदे, अनिकेत पाटील, कैलास झोपे, विलास अवचार, संजय बोचरे, प्रमोद पाटील, धीरज पाटील, सुमित बर्हाटे, गोकुळ बाविस्कर, जयप्रकाश शुक्ला, भावेश चौधरी, सागर चौधरी, राहुल तायडे, चेतन बोरोले, श्रेयस इंगळे, चेतन सावकारे, नंदकिशोर बडगुजर, गोपीसिंह राजपूत, रहेमान शेख, चेतन शर्मा आदींची उपस्थिती होती.
भुसावळात महिलांच्या रॅलीने वेधले लक्ष
भुसावळ : सरदार वल्लभभाई पटेल जयंती व राष्ट्रीय एकात्मता दिनाचे औचित्य साधून लेवा स्त्री जागर ग्रुपच्या वतीने महिलांची भव्य मानवंदना रॅली मंगळवारी काढण्यात आली. सुमारे 300 महिलांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. रॅलीला भुसावळ हायस्कूलपासून सुरूवात होवून रॅली जुना सातारा भागातून सरदार वल्लभभाई पुतळ्यापर्यंत आल्यानंतर लेवा स्त्री जागरच्या गु्रपच्या वतीने सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. रॅलीचे आयोजन प्रा.डॉ.सीमा देवेंद्र पाटील व प्रीती मुकेश पाटील यांनी केले.



