वरणगाव – शहराच्या शिवाजी नगर जवळ दोन मोटारसायकलीची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने दोघ मोटरसायकल स्वार ठार झाल्याची घटना बुधवार दि १ रोजीच्या रात्रीच्या वेळी घडली

या बाबत माहिती अशी की तालुक्यातील फुलगाव येथील रहिवाशी विजय रामकृष्ण महाजन ( ४५ ) हे वरणगाव कडून घरी फुलगाव कडे आपल्या मोटर सायकल क्र एम एच १९ सी एल o२४९ ने जात असताना फुलगाव कडून वरणगाव कडे येणारी दुसरी मोटरसायकल क्र एम एच १९ ए एच ९१८४ वरील ललित पितांबर धांडे ( २६ ) रा गणपती नगर वरणगाव या दोघा मोटरसायकलीत समोरासमोर शिवाजी नगर जवळ जोरदार धडक दिल्याने दोघेही रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तात्काळ वरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारा साठी दाखल करण्यात आले होते मात्र डॉक्टरानी तपासणीअंती मृत घोषित केले
या बाबत वरणगाव पोलीस रटेशनला अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा तपास पोलीस करीत आहे
विजय महाजन हे माजी ग्रामपंचायत सदस्य होते तर दि ५ नोव्हेबर रोजी होणाऱ्या फुलगाव ग्रामपंचायती निवडणूकीत वार्ड क्र १ मधुन उमेदवारी करीत होते त्यांच्या पश्च्यात पत्नी , दोन मुली , आई , एक भाऊ , दोन बहिणी असा परिवार आहे
तर ललित धांडे व त्याची पत्नी हे दोघेही मुबंई येथे एका स्वाटवेअर कंपणीत कामाला होते गेल्या दोन दिवसा पुर्वीच वरणगावला सुट्टीवर पत्नीसह आले होता बुधवार रोजी आई वडिल व पत्नी सह यावल येथे त्यांच्या काका कडे भेट घेण्यासाठी गेलेला होता तिघ यावलाच मुक्कामी थांबले तर ललित हा मोटर सायकलवरून रात्रीच्या वेळी वरणगावला येत असताना घराच्या थोड्याच अंतरावर त्यांच्यावर काळाने झडप घातली
या घटनेमुळे वरणगाव व फुलगाव येथे शोककळ पसरली असुन हळहळ व्यक्त करण्यात येत आहे


