सतिश मोहगांवकर यांची गोवा येथे होणा-या ३७ व्या राष्ट्रीय खेळ २०२३ मध्ये योगासन खेळासाठी टेक्निकल ऑफिशिअल म्हणून नियुक्ती.

भुसावळ – दिनांक ५ ते ९ नोव्हेंबर २०२३ Campal Open Ground (Campal Sports Village) येथे होणा-या नॅशनल गेम २०२३ (राष्ट्रीय खेळ) साठी योगासन भारत राष्ट्रीय महासंघाकडून भुसावळ येथे रेल्वे मध्ये मुख्य तिकिट निरीक्षक म्हणून कार्यरत सतिश मोहगांवकर यांची योगासन खेळासाठी टेक्निकल ऑफिशियल (तांत्रिक अधिकारी) म्हणून निवड करण्यात आली आहे.
सतिश मोहगांवकर हे योगासन भारत या राष्ट्रीय संघटनेचे टेक्निकल कन्ह्वेनर व महाराष्ट्र योगासन स्पोर्टस असोसिएशन (राज्य संघटना) चे टेक्निकल डायरेक्टर आणि उपाध्यक्ष आहेत. त्यांना सन २०२२ ला राष्ट्रीय क्रीडा दिनाचा दिवशी सर्वोत्तम राष्ट्रीय योगासन ज्युरी (पंच) पुरस्कार मिळाला आहे. ते गेल्या ४० वर्षापासून योगासन खेळाच्या क्षेत्रात पंच, तांत्रिक अधिकारी व योग प्रसारक म्हणून कार्यरत आहेत.
बृहन्महाराष्ट्र योग परिषदेचे गेल्या २५ वर्षांपासून तांत्रिक संचालक आणि स्पर्धा प्रमुख म्हणून ही यांनी भुमिका बजावत आहेत. त्यांची खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम बेंगलोर आणि खेलो इंडिया युथ गेम पंचकुला येथील योगासन खेळ स्पर्धांमध्ये इंटरनॅशनल टेक्निकल ऑफिशियल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
रेल्वे प्रशासन सदैव अशा प्रकारच्या कार्यासाठी पाठिंबा आणि प्रोत्साहन देत असतात. आपल्या ह्या यशाचे श्रेय भुसावळ मंडळ रेल्वे प्रशासन व गुरुवर्य डॉ.अरुण खोडस्कर व महाराष्ट्र स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांना देतात.