नाहाटा महाविद्यालय सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी:


भुसावळ : भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस प्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील व उपप्राचार्य डॉ.बी.एच.बर्‍हाटे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.आर.एस.नाडेकर यांनी राष्ट्रीय एकता दिनाची शपथ घेतली. उपप्राचार्य डॉ.बी.एच.बर्‍हाटे, डॉ.गौरी पाटील, डॉ.आर.एस.नाडेकर, डॉ.डी.एम.टेकाडे, प्रा.भूपेंद्र बाणाईत, प्रा.हर्षल पाटील, डॉ. स्वाती फालक, डॉ.उमेश फेगडे, डॉ.सचिन कोलते, प्रा.पौर्णिमा पाटील, किशोर नारखेडे, विनय चौधरी, प्रा.अर्चना भालेराव, प्रा.तेजल वारके, प्रा.नयना चौधरी यासह इतर प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.