भुसावळ :- भारतीय बोद्ध महासभा जळगाव पूर्व विभागा अंतर्गत भुसावळ तालुका व बोदवड तालुक्यात दहा दिवशीय महिला उपासिका 29/10/23 रविवार पासून सुरु करण्यात आले.
तसेच भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील आंबेडकर नगर तर बोदवड तालुक्यातील करंजी, निमखेडी येथे जिल्हा अध्यक्ष रवींद्रजी वानखेडे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शिका वरणगाव येथे केंद्रीय शिक्षका सुमित्रा सर्वटकर, करंजी येथे केंद्रीय शिक्षिका माधुरी भालेराव व निमखेडी येथे केंद्रीय शिक्षिका वैशाली सरदार हे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी जिल्हा सरचिटणीस आनंद ढिवरे, जिल्हा संघटक प्रकाश सरदार व बी. के. बोदडे, संरक्षण सचिव सुरेश जोहरे, महिला अध्यक्ष प्रियांका अहिरे, करुणा नरवाडे, इत्यादी नी महिला उपासिका शिबिरास मार्गदर्शन व हार्दिक शुभेच्छा दिल्या भुसावळ तालुका अध्यक्ष उत्तम सुरवाडे, सचिव अरुण तायडे, उपाध्यक्ष संस्कार विभाग आनंद सपकाळे, रिंकू सोनवणे, नितीन बोदडे, बोदवड तालुका अध्यक्ष शांताराम मोरे, शहर अध्यक्ष जगन गुरचंळ इत्यादी प्रमुख पदाधिकारी व परिसरातील महिला मोठया प्रमाणात उपस्थित होते.





