भुसावळ – येथील ताप्ती पब्लिक सीबीएसईं इग्लीश मीडीयम स्कूल मध्ये विजया दशमीच्या पाश्वभुमीवर रामलीला हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या प्राचार्या निना कटलर यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना निना कटलर यांनी विद्यार्थ्यांना रामलीला आणि विजया दशमी या सणाची माहीती संगीतली.शाळेतील रामलीला नाट्यातील विद्यार्थी श्रीराम,लक्ष्मण,सिता,हनूमानजी व रावण यांच्या वेशात होते. त्यानंतर विद्यार्थ्यांनी नृत्य, व रामायणावर लघुनाटिका सादर केले. शाळेच्या मैदानावर रावण तयार करण्यात आला होता. विद्यार्थांनी जय श्रीराम नामाचा जय घोष घातला त्यानंतर प्राचार्य निना कटलर यांनी रावण दहन केले.ताप्ती स्कुलचा परिसर रावण दहन ने गजबजला होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षिका श्रद्धाली घुले,मनप्रीत कौर,हर्षला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जयश्री मोरेस्कर,गायत्री घिर्णिकर, काजल महाजन,कार्यालयीन अधीक्षक सविता सहजे,पौर्णिमा चौधरी,रितू प्रभू देसाई,वर्षा काळे,पल्लवी बत्रा,अनिता कोळी,नितीन अडकमोल, विजय संकट,अर्जुन सनस व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.



