भुसावळ -आयुष्य जगत असताना प्रत्येक स्त्रीने वेळोवेळी सजग व सावध राहणे अत्यंत गरजेचे आहे असे प्रतिपादन सौ आरती चौधरी यांनी केले.स्वःताचे रक्षण कसे करावे याबद्दल प्रात्यक्षिकाव्दारे मार्गदर्शन केले.

येथील भुसावळ कला, विज्ञान, आणि पी. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात युवती कल्याण समिती व महिला तक्रार निवारण समिती, विशाखा समिती ह्यांच्या संयुक्त विद्यमाने उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष स्थानी प्रा. डॉ. स्मिता चौधरी आणि उद्घाटक व प्रमुख वक्ता सौ. आरती चौधरी या होत्या.
अध्यक्षीय भाषणात डॉ स्मिता चौधरी यांनी महिलांमध्ये आत्मविश्वास असणे खूप महत्वाचे आहे तसेच स्त्री-पुरुष समानता या विषयांवर माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवती कल्याण समिती प्रमुख प्रा. डॉ. गौरी पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. रश्मी शर्मा यांनी केले. महिला तक्रार निवारण, विशाखा समिती प्रमुख प्रा. डॉ. विद्या पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. सौ स्वाती फालक,
प्रा. डॉ. सौ. ममताबेन पाटिल, प्रा. स्मिता बेंडाळे, प्रा. पूनम महाजन, प्रा. संगीता भिरुड यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापिका व असंख्य विद्यार्थीनी उपस्थित होत्या.


