भुसावळात गावठी कट्टया सह दोघे ताब्यात ! –

भुसावळ – शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील खडका रोड वरील एम.आय.तेली शाळे जवळील आयान कॉलनी परिसरात गावठी पिस्टल कब्जात बाळगणाऱ्या संशयितास तसेच विक्री करणाऱ्यास उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे पथकाने ( ता.२०) ऑक्टोबर रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास एक गावठी कट्टा,दोन जिवंत काडतुस, एक मोटरसायकल व एक मोबाईल असे मुद्देमाला सह दोघांना ताब्यात घेतले.सदरील कारवाई पोहेकॉ. सूरज पाटील व पोना.संकेत झांबरे अशांनी मिळून केली. बाजारपेठ पोलीस स्टेशनला रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.